Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओबीसी युवक-युवतींच्या कौशल्य विकासाकरिता नवीन वेबपोर्टल

team by team
May 13, 2022
in राजकीय
0
ओबीसी युवक-युवतींच्या कौशल्य विकासाकरिता नवीन वेबपोर्टल

मुंबई l प्रतिनिधी
राज्यातील इतर मागास प्रवर्गातील युवक -युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने नवीन वेबपोर्टल http://www.msobcfdc.org तयार करण्यात आले आहे. ओबीसी युवक-युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माहितीसाठी या  वेबपोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या http://www.msobcfdc.org या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. मंत्रालयासमोरील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर, कौशल्य विकास अधिकारी विजय काटोलकर यावेळी उपस्थित होते.
श्री. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केले आहे. इतर मागासवर्ग प्रवर्गातील परंपरागत व्यवसायात असलेल्या व्यक्तींनाही या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेवून व्यावसायिक स्पर्धेत उतरता येईल. कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थींना महामंडळाच्या थेट कर्ज योजना व व्याज परतावा योजनेचा लाभ घेवून व्यवसायदेखील उभा करता येईल.  या योजनेचा लाभ 18 ते 50 वर्ष वयोगटातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना घेता येवू शकतो. अधिक माहितीकरिता http://www.msobcfdc.org या वेबपोर्टलवरील कौशल्य प्रशिक्षण योजना या लिंकला भेट द्यावी.

बातमी शेअर करा
Previous Post

जैन शासन स्थापना दिवस निमित्ताने अक्कलकुवा येथे विविध कार्यक्रम उत्साहात

Next Post

दाखल्यांसाठी संजय गांधी निराधार योजनच्या लाभार्थिनी घेतली तहसीलदारांनी भेट

Next Post
दाखल्यांसाठी संजय गांधी निराधार योजनच्या लाभार्थिनी घेतली तहसीलदारांनी भेट

दाखल्यांसाठी संजय गांधी निराधार योजनच्या लाभार्थिनी घेतली तहसीलदारांनी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add