Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

परिचारिकांचे सेवा कार्य उल्लेखनीय : डॉ. के. डी. सातपुते

team by team
May 12, 2022
in आरोग्य
0
परिचारिकांचे सेवा कार्य उल्लेखनीय : डॉ. के. डी. सातपुते

नंदुरबार l प्रतिनिधी
वैद्यकीय क्षेत्रात विशेषत: कोरोना काळात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व परिचारिकांचे सेवा कार्य उल्लेखनीय असे ठरले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या कार्यास सलाम असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. डी. सातपुते यांनी केले.
नंदुरबार जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्रात जागतिक परिचारिका दिनानिमित्त गेल्या दोन वर्षात उत्तीर्ण झालेल्या एएनएम आणि जीएनएम मधील विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी तसेच उत्कृष्ट परिचारिका यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी दीपप्रज्वलनासह आधुनिक परिचारिकेचे जनक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य जितेंद्र चव्हाण यांनी जागतिक परिचर्या दिनाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. के. डी. सातपुते होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अधीसेविका शैलजा मोरे, परिचारिका सुषमा गावित,नम्रता मदने, निकिता चव्हाण, आकाश केंद्रे,सुशील केदार,ममता ठाकरे सोनल कोडोलीकर, संतोष मुठे उपस्थित होते. नंदुरबार परिचर्या प्रशिक्षण केंद्रातून सन 2019 -20 आणि 2021 या कालावधीत प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या तसेच उत्कृष्ट कार्य असलेल्या परिचारिका यांना गौरविण्यात आले. कोवीड नंतर दोन वर्षाच्या कालावधीने साजरा झालेल्या जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्वांच्या चेहऱ्यावर चैतन्य व हास्य उमलले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाची काजल चव्हाण आणि प्रीती पानपाटील यांनी केले तर आभार सुशील केदार यांनी मानले . परिचारिका सप्ताहाचे सुयोग्य नियोजन प्राचार्य जितेंद्र चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रथम व द्वितीय तसेच तृतीय वर्षातील परिचर्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे रविवारी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी

Next Post

नवापूर पालिकेवर संतप्त नागरिकांचा हंडा मोर्चा, मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add