नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील घोगळपाडा येथून १५ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील घोगळपाडा येथील एका १५ वर्षीय मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याबाबत मुलीच्या वडीलांनी विसरवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुरेश मोरे करीत आहेत.








