Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाण्‍याविहीर शिवारातील शेतात बिबट्याचा वासरुवर हल्ला

team by team
May 11, 2022
in कृषी
0
वाण्‍याविहीर शिवारातील शेतात बिबट्याचा वासरुवर हल्ला

खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्‍याविहीर (बुद्रुक ) शिवारातील शेतात काल दि. 9 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून वासरू ला ठार करून फस्त केल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच रात्री वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सतर्क केल्याची माहिती आहे सदर बिबट्या हा परिसरात धुमाकूळ घालत असून वनविभागाने त्याच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल दि.9 मे रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वाण्याविहीर (बुद्रुक) शिवारातील कोमा सिंगा वळवी यांच्या शेतात गाय व तिचे वासरू बांधलेले असताना अचानक पणे गायीच्या वासरूवर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच ग्रामस्थांनी या बिबट्याला पिटाळून लावले या घटनेचे माहिती वन विभागातील कर्मचाऱ्यांना कळविण्यात आली त्यांनीही रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील आपले पशु धान शेतातून आपल्या घरी सुरक्षित ठिकाणी आणले मृतावस्थेतील वासरूला त्याठिकाणी राहू देण्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितल्याने त्याला रात्री तिथेच सोडून देण्यात आले रात्री पुन्हा बिबट्याने त्याला सुमारे एक किलोमीटर अंतरावर घेऊन जात त्या वासरूला फस्त केल्याचे सकाळी निदर्शनास आले सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांनी उद्याच्या पंचनामा केला बिबट्याच्या या परिसरातील संचारा मुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने त्वरित या बिबट्या चा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी तसेच ग्रामस्थांकडून केली जात आहे.

वाण्याविहीर (बुद्रुक), टिमकमऊली, विरपुर रामपूर, या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेळ्यांच्या फडशा बिबट्याने पाडल्याची खात्रीलायक माहिती असून या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भीतीचे वातावरण आहे याबाबत वनविभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना माहिती नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत सुदर बिबट्या हा आकाराने मोठा असून या परिसरात अनेकांनी या बिबट्याला पाहिल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले.

या घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर रात्री साडे दहा वाजेला वनकर्मचारी काळे, जाधव ,कोकणी, गावित ,वनमजूर वळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत वन्य प्राण्यांविषयी जनजागृती केली या परिसरातील शेतकऱ्यांना आपले पशुधन घेवून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन केले.

वाण्याविहीर गावासह परिसरातील अनेक गावांच्या शेत- शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून हा बिबट्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहचवत असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांमधील व ग्रामस्थांनी मधील भीती दूर करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ

Next Post

जितेंद्र प्रजापति यांचा कुंभार समाजातर्फे सत्कार

Next Post
जितेंद्र प्रजापति यांचा कुंभार समाजातर्फे सत्कार

जितेंद्र प्रजापति यांचा कुंभार समाजातर्फे सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add