नवापूर | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील करंजी ओवरा पुलावर विना परवाना देशी विदेशी दारु वाहतुक करणार्या गाडीसह १ लाख ८५ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा़ दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुद्धांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे रोजी दुपारी १ वाजता नवापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना गुप्त माहीतीवरुन करंजी ओवरा पुलावर सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,पो हे का पंकज सुर्यवंशी,विकी वाघ यांनी सापळा रचला असता. संशयीत आरोपी गणेश सिंगा गावीत रा.लक्कडकोट ता. नवापुर, व सलमान विजय वळवी रा. खोकारवाडा ता. नवापुर हे त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची कार (क्र. जी.जे.१९, ए.A १४९१) हिच्यात विना परवाना देशी विदेशी दारु वाहतुक करतांना आढळुन आला.पोलीसांनी गगाडी तपासली असता त्यात एकुण १ लाख ५ हजार ४२० रूपये किमंतीचा मुद्देमाल यासह ८० हजाराची गाडी असा एकुन १ लाख ८५ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी भादवि कायदा कलम ६५ (ई),१०८ प्रमाणे कायदेशिर फिर्याद देण्यात आली आहे..पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,पो हे का पंकज सुर्यवंशी,विकी वाघ,दादाभाई वाघ,प्रेमचंद जाधव करीत आहे.