नंदुरबार l प्रतिनिधी
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय किसान सेना व भिलीस्थान लायन सेनेतर्फे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडीत तडवी, शहराध्यक्ष राजू माळी, तालुकाध्यक्ष रोहिदास वळवी, भटके-विमुक्त जाती जमाती चे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव ,ढढाने चे सरपंच नितीन नागरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, भरत पाटील, भैय्या राजपूत ,पंकज चव्हाण, भास्कर तडवी, चंद्रसिंग गिरासे ,संजीव गिरासे, कृष्णा राजपूत, शुभम गिरासे ,आदी उपस्थित होते. यावेळी किसान सभेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या कार्याला उजाळा दिला.








