नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील ढेकवद गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील मोरकारंजा येथील विनायक धर्मा गावित व त्यांची पत्नी रेशमीबाई विनायक गावित हे दोघे दुचाकीने नंदुरबारहून मोरकारंजा गावाकडे जात होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार (क्र.जी.जे.०५ जेजे ६०३८) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन ढेकवद गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात विनायक गावित व रेशमीबाई गावित यांना दुखापत झाली. याबाबत विनायक गावित यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.विनायक सोनवणे करीत आहेत.








