नवापूर ! प्रतिनिधी
कोरोना काळात नवापूर नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ पुर्ववत सफाई कामगारांना कामावर न घेतल्यासनवापूर शहरातील नागरीकांच्या मदतीने जनआंदोलन छेडण्यात येईल या बाबत चे प्रसिध्द जि.प सदस्य भरत गावीत यांनी नवापूर पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे.
नवापूर नगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत गेल्या ८ ते १० वर्षापासुन कंत्राटी सफाई कामगार कार्यरत आहेत व मागील २ वर्षापासुन कोरोना महामारीपासुन नवापूर शहरात योग्यरीत्या साफसफाईचे कामे इमानेइतबारे व प्रामणिकपणे करीत होते . आज नवापूर शहर या सफाईकामगारांमुळे सुरक्षित आहेत.नवापूर नगरपालिकेच्या नियोजनशुन्य काराभारामुळे आज ७० पेक्षा जास्त कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. गेल्या ४ दिवसापासुन त्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे त्यामुळे नवापूर शहरात मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. सध्या पावसाळयाचा हंगाम सुरु असुन ठिकठिकाणी पाणी तसेच कचरा साचुनbत्यामुळे साथिचे आजार पसरण्याचे दाट शक्यता आहे त्यामुळे नागरीकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. यामुळे शहरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण आहे. शहराचे तसेच नागरीकांचे आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी जि.प.सदस्य भरत गावीत यांनी मुख्याधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क केले असता सदर कामगारांच्या ठेका संपला आहे व तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे असे त्यांच्याकडुन समजले.
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत देण्यात आलेल्या ठेका संपण्याच्या १ महिना अगोदर मुदतवाढ किंवा नवीन ठेक्यासाठी निवीदा प्रकाशित करणे व तांत्रिक मंजुरी
घेण्याचे काम नवापूर नगरपालिकेचे असतांना यावर प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष झाल्याचे निर्दशनास येत आहे. जर नवापूर नगरपालिकेने यावर ठोस उपाययोजना
करुन लवकरात-लवकर सफाई कामगारांना कामावर घेतले नाही तर जन आंदोलन छेडण्यात येईल असे भरत गावीत यांनी प्रसार माध्यमांना आश्वासीत केले आहे.
तसेच आपणांव्दारे प्रशासनाला व समस्त लोकप्रतिनिधींना विनंती करीत आहेत की या कोरोना काळात सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ देऊ नका त्यांना
लवकरात-लवकर उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन द्या व जातीने लक्ष देऊन सफाई कामगारांचे प्रश्न मार्गी लावुन कमी करण्यात आलेल्या सफाईकामगारांना तातडीने
पुर्ववत कामावर घेण्यात यावे व शहराला घाणीमुळे होणाऱ्या त्रासापासुन वाचवावे असे प्रशासनाला आवाहन केले आहे.असे प्रसिध्दी पत्र जि.प सदस्य भरत गावीत यांनी दिले आहे.