नवापूर ! प्रतिनिधी
वैद्यकीय प्रवेश निर्णयाबद्दल भाजपा अल्पसंख्याक मोर्चातर्फे मोदी सरकारचे अभिनंदन. वैद्यकीय प्रवेशात केंद्रीय कोट्यातून आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला १० टक्के आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. मुस्लीम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कारागीर, उद्योजकांसाठी मुद्रा योजनेतून त्वरीत कर्ज यासारख्या अनेक योजनांतून मोदी सरकारने सब का साथ सब का विकास ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठीच्या प्रवेशात आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे मुस्लीम विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्याची संधी दिल्याबद्दल भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा तर्फे मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात आले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , मनमोहन सिंग सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तींचा फायदा २० लाख मुस्लीम विद्यार्थ्यांना मिळत होता. मोदी सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्यांचा लाभ २ कोटी हुन अधिक मुस्लीम विद्यार्थ्यांना मिळत आहे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी स्पर्धा परीक्षेत फार थोड्या संख्येने मुस्लीम उमेदवार उत्तीर्ण होत असत. मोदी सरकारच्या काळात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वैद्यकीय , इंजिनिअरिंग , सरकारी नोकऱ्या आदी स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करण्यासाठी आर्थिक साहाय्य पुरविले जात असल्याने स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या मुस्लीम विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. मुद्रा योजनेतून अनेक मुस्लीम युवकांना , कारागीरांना आपापला उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकांकडून कर्जपुरवठा झाला आहे. त्याच बरोबर मुस्लीम महिलांना उज्ज्वला योजनेचाही मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.अशी माहिती प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा एजाज देशमुख, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख यांनी दिली आहे.