Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उत्कृष्ट संघटन कौशल्याबद्दल नरेश पवार यांचा खा . शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मान

team by team
May 2, 2022
in राजकीय
0
उत्कृष्ट संघटन कौशल्याबद्दल नरेश पवार यांचा खा . शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मान

नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय फ्रंटलर सेलचे उपाध्यक्ष नरेश पवार यांनी केलेल्या पक्षाच्या उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि कंजरभाट समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा . शरदचंद्र पवार यांच्या हस्ते नरेश पवार यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .

मुंबई येथील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्या वतीने कृतज्ञता गौरव सोहळा घेण्यात आला . या सोहळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यासाठी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला . नंदुरबार येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे उपाध्यक्ष नरेश पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ . अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना महामारी काळात विविध उपक्रम राबविले . तसेच कंझरभाट समाजाच्या प्रश्नांविषयी न्याय मिळवून देण्याचे कार्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्कृष्ट संघटन कौशल्य केले . या उत्कृष्ट संघटन व कार्य कौशल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा . शरदचंद्र पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय फ्रंटलर सेलचे उपाध्यक्ष नरेश पवार यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड , प्रदेश सरचिटणीस संजय ब्राम्हणे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सरचिटणीस शिवाजी गर्जे , राष्ट्रीय बंजारा सेलचे अध्यक्ष किसन राठोड आदी उपस्थित होते .

बातमी शेअर करा
Previous Post

निवृत्त कर्मचारी शहादा ईपीएस ९५ संघटनेतर्फे कामगार मेळावा उत्साहात

Next Post

नंदूरबार येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत 388 प्रकरणे मंजूर,62 प्रकरणे नामंजूर, बँकेचे खाते आधार लिंक कार्डशी लिंक करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add