नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय किसान सेना जिल्हा संघटकपदी लालसिंग पारशी तडवी यांची नियुक्ती प्रदेश महासचिव पंडित तडवी यांनी केली.
भारतीय किसान सेना जिल्हा संघटकपदी लालसिंग पारशी तडवी रा.मोदीलालपाडा (विरपुर ) ता. शहादा यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश महासचिव पंडित तडवी यांच्या हस्ते लालसिंग पारशी तडवी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी प्रदेश प्रवक्ता सुभाष नेरकर ,विमुक्त भटके नंदूरबार जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव , नंदूरबार तालुका उपाध्यक्ष रविदास वळवी, सुनील भिल, शहादा तालुका अध्यक्ष किशोर पाटील, आत्माराम महाराज आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.










