नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ वा वर्धापन दिवस निमित्त जी.टी पाटील महाविद्यालयात शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी तर नगरपरिषदेत नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
१ मे महाराष्ट्र दिवस निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ध्वजारोहण करण्यात येणार असून, नंदुरबार तालुका विधायक समितीच्या जी.टी पाटील महाविद्यालयात शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सकाळी ८.४० वाजता तर नगरपरिषदेत नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते सकाळी ६.५५ वाजता ध्वजारोहण करण्यात येईल. ध्वजारोहण प्रसंगी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.










