Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्याची महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी

team by team
April 30, 2022
in सामाजिक
0
जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्याची महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
प्रतिवर्षी तिथीनुसार अक्षयतृतीयेला क्रांतीसुर्य, थोर समाज सुधारक ,जगतज्योती, महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती असते. अनेक वर्षापासून मंत्रालयासह राज्यात सर्वत्र महात्मा बसवेश्वर जयंती साजरा होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये देखील महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व्हावे अशी मागणी महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती 3 मे रोजी अक्षयतृतीयेला आहे. संदर्भात नंदुरबार जिल्हा प्रशासनाला सन 2009 मध्ये महाराष्ट्र बसव परिषद नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय वगळता इतर कुठलयाही शासकीय, निमशासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन होत नसल्याचे दिसून येत आहे. मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून साजरी करण्याचे अध्यादेश शासनाने नुकतेच काढले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील सर्वच कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक सूचना निर्गमित करून अंमलबजावणी बाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी सु. ज. तुमराम यांनी परिपत्रकाद्वारे काढले आहेत. लिंगायत धर्माचे संस्थापक , क्रांतीज्योती, थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये अक्षय तृतीयेला तिथीनुसार जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्याची मागणी महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यातून भरत रामचंद्र बारी यांना आदर्श तलाठी पुरस्कार जाहीर

Next Post

भटू धनगर यांच्यासह जिल्ह्यातील 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पोलीस महासंचालक पदक जाहीर

Next Post
भटू धनगर यांच्यासह जिल्ह्यातील 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पोलीस महासंचालक पदक जाहीर

भटू धनगर यांच्यासह जिल्ह्यातील 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पोलीस महासंचालक पदक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add