नंदुरबार l प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांना “राज्यस्तरीय चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पत्रकारिता पुरस्कार 2022” आज जाहीर झाला. मुंबई येथे पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडणार आहे.
पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या भरीव योगदान व मागील दोन वर्षाच्या कोरोणा कालावधीत पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या पूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा आदिवासी सेवक पुरस्कार, ग्रंथ मित्र पुरस्कार,भारत सरकार युवा पुरस्कार,पत्रकारितेत प्रतिष्ठेचा समजला जाणारा दर्पण पुरस्कार, बाबा दळवी शोध पत्रकार पुरस्कार,डॉ ना भी परूळेकर पुरस्कार, राज्यस्तरीय मानवी हक्क पुरस्कार, गोदावरी जीवन गौरव पुरस्कार, दिपस्तंभ पुरस्कार, समता रत्न पुरस्कार, यासह शासनाच्या व विविध संस्था-संघटनांच्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांनी विधानसभा, लोकसभा सत्राच्या कामकाजचे तसेच विविध राज्याचे निवडणूकींचे वृत्तांकन केले आहे.याशिवाय साहित्य क्षेत्रात देखिल त्याचे भरीव योगदान असून त्यांनी सहा पुस्तकांचे लेखन केले आहे.नंदुरबार साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष असून नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद देखिल त्यांनी भूषविले आहे.अखिल भारतीय साहित्य संमेलनात सलग तीन वर्ष निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे.आता पर्यत त्यांनी १२ देशांचा प्रवास करून विविध क्षेत्राचे ज्ञान अर्जित केले आहे.








