युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे दि.०६ ऑगस्ट २०२१ शुक्रवार रोजी नंदुरबार जिल्हा दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते विविध पदांसाठी मुलाखती घेणार असून पदाधिकार्यांशी संवाद देखील साधणार आहेत.
युवासेनेचे प्रमुख तथा पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार युवासेनेचे सचिव वरुण देसाई हे दि.६ ऑगस्ट रोजी नंदुरबार दौर्यावर येणार आहेत. या दिवशी साई भगवती लॉन्स येथे दुपारी १२ वाजता पदाधिकारी संवाद साधून त्यानंतर पत्रकार परिषद होईल. लगेच विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिवसेनेच्या व युवासेनेच्या पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे तथा युवासेनेचे जिल्हाधिकारी अर्जुन मराठे यांनी केले आहे.