Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी, गुजरातचे चोर मोटर सायकल विक्री करायचे नंदूरबारात, पाच जणांना अटक, 19 दुचाकी जप्त, हे नंबर आहेत गाड्यांचे

team by team
April 30, 2022
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी, गुजरातचे चोर मोटर सायकल   विक्री करायचे नंदूरबारात, पाच जणांना अटक, 19 दुचाकी जप्त, हे नंबर आहेत गाड्यांचे

नंदूरबार l प्रतिनिधी
मोटर सायकल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद कीली असून , 10 लाख 80 हजार रुपये किमतीच्या 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.याप्रकरणी 5 संशयित आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यात मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवुन पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते म्हणून प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी मासिक गुन्हे बैठकीत मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतुन मोठ्या प्रमाणात मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल असुन बरेचसे गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नाहीत . मोटर सायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले होते . पोलीसांसमोर देखील चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणे हे मोठे आवाहन होते . त्याअनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत मा . प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी निर्देश दिले . वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटर ल चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण , वेळ , दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटर सायकल यांची इथ्थंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील , जेलमधुन सुटुन आलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवुन होते . तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते . दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास खुशाल फेऱ्या पावरा रा . सुर्यपुर ता . धडगांव जि . नंदुरबार याच्या मालकिची ड्रिम युगा CB 110 (क्रमांक MH – 39 R 3468) ही नंदुरबार शहरातील जळका बाजार परीसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील धानोरा , गुजरभवाली व नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्यातील निझर तालुक्यातील रायगड व हातनुर येथील काही तरुण मुले नंदुरबार जिल्ह्यातुन व गुजरात राज्यातुन दुचाकी मोटर सायकल चोरुन नंदुरबार शहरातील कंजरवाडा येथील एका इसमास विक्री करण्यासाठी देतात . अशी बातमी मिळाल्याने , सदरची माहिती
प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सांगितली . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे 3 . पथके तयार करून मिळालेल्या बातमीची संपुर्ण माहिती काढून कारवाई करणेबाबत त्यांना सुचना दिल्या . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील धानोरा , गुजरभवाली व नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्यातील निझर तालुक्यातील रायगड व हातनुर येथे 3 ते 4 दिवस मुक्काम करुन मिळालेल्या बातमीमधील संशयीत इसमांच्या घराच्या परीसरात वेषांतर करून माहिती प्राप्त केली असता मिळालेली माहिती खात्रीशिर असलेबाबत समजले . त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एकाच वेळी चारही संशयीत आरोपीतांच्या घरी धाड टाकुन सर्व संशयीत आरोपीतांना ताब्यात घेण्याबाबत नियोजन केले . त्याप्रमाणे दि. 25 एप्रिल रोजी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी एकाच वेळी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील धानोरा , गुजरभवाली व गुजरात राज्यातील निझर तालुक्यातील रायगड व हातनुर येथील संशयीतांच्या घरी अचानक छापा टाकुन त्यांना ताब्यात घेतले . ताब्यात घेण्यात आलेले नितेश किरण वळवी रा . मंदीरफळी धानोरा ता.जि. नंदुरबार, अविनाश जगदीश वसावा रा . सरपंच गल्लीच्या मागे , रायगड ता . निझर जि . तापी, रोहित दास वळवी रा हातनुर ता . निझर जि . तापी, कुंदन ऊर्फ सचिन राजेश पाडवी वय 25 रा . गुजरभवाली ता.जि. नंदुरबार यांना स्थानिक गुन्हे शाखेत आणुन विचारपुस केली असता त्यांची सर्वांची ओळख सुरत येथे एका कंपनीत काम करीत असतांना झाली होती व त्या सर्वांनी मिळुन मागील काही दिवसांमध्ये नंदुरबार शहरातील मंगळ बाजार व गुजरात राज्यातील उमरा , वराछा , खटोदरा , वालोद , सुरत , ओलपाडा , पुनागाम इत्यादी ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्या होत्या . तसेच सदर चोरी केलेल्या दुचाकींपैकी संशयित आरोपी नितेश किरण वळवी रा . मंदीरफळी धानोरा ता . जि . नंदुरबार यांच्याकडुन 2 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 4 एक्टीवा 125 , 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 2 सुझुकी एक्सेस 125 व 1 लाख रुपये किमतीची एक होंडा युनिकॉर्न मोटर सायकल असे एकुण 4 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 7 दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याबाबत गुजरात राज्यातील उमरा , ओलपाड , पांडेसरा , वालोद , सुरत पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत . तसेच कुंदन ऊर्फ सचिन राजेश पाडवी रा . गुजरभवाली ता.जि. नंदुरबार याच्याकडुन 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या 3 सुझुकी एक्सेस 125 , 70 हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न , 50 हजार रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर , 45 हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टीवा , 50 हजार रुपये किमतीची हिरो ड्युट मोटर सायकल असे एकुण 3 लाख 95 हजार रुपये किमतीच्या 7 दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याबाबत गुजरात राज्यातील पुनागाम व सुरत शहर हद्दीतील इतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत . • तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता चारही संशयीतांनी अतिशय धक्कादायक माहिती सांगितली . त्यांनी सांगितले की , त्यांनी चोरी केलेल्या दुचाकी नंदुरबार कंजरवाडा येथील राहुल यास विक्री करुन देण्यासाठी देणार होते . तसेच राहुल यास ज्या मोटर सायकली पाहिजे असल्यास त्या मोटर सायकल आम्ही चोरी करीत असे . संपूर्ण हकिगत सांगितले . म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील कंजरवाडा परीसरात राहणारा राहुल याची माहिती काढली असता त्यास वरील
चारही आरोपी पोलीसांच्या तावडीत सापडल्याचे माहिती मिळताच तो गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे पळुन गेल्याचे समजुन आले म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ अहमदाबाद गाठले . परंतु अहमदाबाद येथे गेलेल्या पथकाकडे संशयीत आरोपीताचे फक्त नाव होते त्यापलीकडे इतर कुठलीही माहिती नव्हती . अहमदाबादसारख्या एवढ्या मोठ्या शहरात फक्त नावावरुन आरोपीताचा शोध घेणे मोठे आवाहन होते . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हार न पत्कारता प्रयत्न सुरु ठेवले . अखेर तिसऱ्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशयीत आरोपी राहुल याच्या नातेवाईकांचा शोध लावण्यात यश आले व संशयीत आरोपी राहुल हा कुबेर नगर येथे त्याच्या सासुकडे लपून आहे अशी माहिती समजुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने राहुल यास ताब्यात घेतले . त्याचे नाव राहुल संजय अभंगे रा . कंजरवाडा नंदुरबार असे सांगितले . त्यास मोटर सायकल चोरी व ताब्यात घेण्यात आलेल्या चारही आरोपीतांबाबत सांगितले असता तो त्यांना ओळखत नसल्याचे खोटे बोलू लागला म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास नंदुरबार येथे आणून विचारपुस केली असता त्याच्याकडुन 20 हजार रुपये किमतीची होंडा ड्रीम युगा 110 सी.सी. मोटर सायकल (क्र.MH – 39 R – 3468 )त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .1 लाख 55 हजार रुपये किमतीच्या 03 होंडा अॅक्टीवा मोटर सायकल, 70 हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न अशा एकुण 2 लाख 45 हजार रुपये किमतीच्या 5 मोटर सायकल कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन हस्तगत करण्यात आलेल्या आहेत . ताब्यात घेण्यात आलेले नितेश किरण वळवी रा . मंदीरफळी धानोरा ता . जि . नंदुरबार, अविनाश जगदीश वसावा रा . सरपंच गल्लीच्या मागे , रायगड ता . निझर जि . तापी, रोहित दास वळवी रा हातनुर ता . निझर जि . तापी, कुंदन ऊर्फ सचिन राजेश पाडवी रा . गुजरभवाली ता.जि. नंदुरबार, राहुल संजय अभंगे रा . कंजरवाडा नंदुरबार यांना नंदुरबार शहर पोलीस ठण्यात भा.द.वि. कलम 379 या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडूनकडून एकुण 10 लाख 80 हजार रुपये किमतीच्या 19 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत . तसेच न्यायालयाने वरील पाचही आरोपीतांना पोलीस कोठडी सुनावली आहे . चार दिवसापूर्वी देखील स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांनी मोटर सायकल चोरीतील आरोपी खोजल्या वळवी यास अटक करुन 8 मोटर सायकल हस्तगत केल्या होत्या . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार महेंद्र नगराळे , प्रमोद सोनवणे , राकेश वसावे , पोलीस नाईक राकेश मोरे , मनोज नाईक , रमेश साळुंखे , अभय राजपुत , आनंदा मराठे , अभिमन्यु गावीत यांच्या पथकाने केली आहे .

 

बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे कार व दुचाकीचा भीषण अपघातात दुचाकी जळून खाक, तिघे गंभीर जखमी

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील अतिउष्माघाताने एकाचा मृत्यू, ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस दलाचे आवाहन

Next Post
नंदूरबार जिल्ह्यातील अतिउष्माघाताने एकाचा मृत्यू, ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस दलाचे आवाहन

नंदूरबार जिल्ह्यातील अतिउष्माघाताने एकाचा मृत्यू, ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस दलाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add