Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी: निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांची सूचना

team by team
April 29, 2022
in राज्य
0
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी:  निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांची सूचना

नंदुरबार l प्रतिनिधी
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यातील 319 गावे आतापर्यंत तंटामुक्त झालेली आहेत. उर्वरित गावांनीही या मोहिमेत सहभागी होवून गाव तंटामुक्त करावे. त्यासाठी प्रशासनाने या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी येथे दिल्या.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मीनल करनवाल, प्रभारी पोलिस अधीक्षक श्री. विजय पवार, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी,
तहसीलदार, पोलीस स्टेशनचे प्रभारी यांच्यासह तंटामुक्त गाव मोहिम समितीचे सदस्य उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खांदे यांनी सांगितले, गावपातळीवर लहान- लहान कारणांवरून होणाऱ्या वादाचे पर्यावसन मोठ्या वादात होवू न देता गावाची शांतता अबाधित राखण्यासाठी आणि गावातील वाद गावातच सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची स्थापना करण्यात आली होती. या मोहिमेची सर्वत्र प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या मोहिमेंतर्गत अस्तित्वातील तंटे मिटविण्याबरोबरच नव्याने निर्माण झालेले वाद, तंटे मिटविण्याची जबाबदारी देखील तंटामुक्त गाव समितीवर आहे. एवढेच नव्हे, तर गावात तंटे निर्माण होवू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना समितीने कराव्यात. गाव पातळीवरील समित्या कार्यरत करून या मोहिमेच्या माध्यमातून गावा-गावातून तंटे हद्दपार करावेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रभारी पोलिस अधीक्षक श्री. पवार यांनी या मोहिमेविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील 12 पोलीस स्टेशन अतंर्गत 984 गावे व 595 ग्रामपंचायती येतात. यापैकी आतापर्यंत 319 गावे तंटामुक्त झाली असून अद्याप 276 गावे बाकी आहेत. या गावांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच ही मोहीम गाव पातळीवर प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलिस दलातर्फे सर्वंकष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. यावेळेस पोलीस अधिकारी आणि समिती सदस्यांनी महत्वपूर्ण सुचना केल्यात.

बातमी शेअर करा
Previous Post

देहली प्रकल्पाचा वाद पेटला, शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलनचा इशारा

Next Post

अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास दोन वर्षे पर्यंत सक्षम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा, सहकार्याचे प्रशासनाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add