म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाची एप्रिल 2022 ते मार्च 2025 या तीन वर्षा साठी नवीन कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून अर्जुन ब्रिजलाल पाटील व सचिव देविदास दशरथ पाटील यांची निवड झाली,
कार्यकारनीत उपाध्यक्षा म्हणुन सुशिला वसंत पाटिल ,सहसचिव गोटूसिंग धोंडूसिंग गिरासे, तज्ञ संचालक धोंडू शंकर पाटील, गुलाबराव त्र्यंबक पवार, सल्लागार सुभाष तुमडु पाटील,सदस्य शिवाजी यशवंत मराठे ,आनंदा सिताराम पाटील ,केवलसिंग सरदारसिंग गिरासे, भटू तुमडु पाटील, शंकर कत्थु चौधरी, शीला शंकर पाटील, मंगला रूपसिंग गिरासे, शिला देवीदास पाटील यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमात नंदुरबार जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी कोंग्रेसपक्ष ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रताप चव्हाण,सानेगुरजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी व नरहरी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे आनंदराव विसपुते आदि उपस्थित होते.या वेळी अर्जुन पाटिल,माणक चौधरी,आनंदराव विसपुते गुलाबराव पवार प्रताप चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या वेळी प्रास्तविक गुलाबराव पवार यांनी केले तर सूत्रसंचालन देवीदास पाटिल यांनी केले शेवटी आभार सुशिला पाटिल यांनी मानले.