Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यात अवैध बायोडिझेल विक्री पुन्हा जोरात सुरू, अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

team by team
April 28, 2022
in क्राईम
0
अक्कलकुवा तालुक्यात अवैध बायोडिझेल विक्री  पुन्हा जोरात सुरू, अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

खापर l वार्ताहर
बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर अक्कलकुवा तालुक्यात वान्याविहीर ते पेचरीदेव दरम्यान हॉटेल्स व ढाब्यावर पुन्हा बायोडिझेलची सर्रास विक्री सुरू झाली आहे.पोलीस व महसूल विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मलिदा लाटून ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असल्याची सद्यस्थितीत तालुक्यात असल्याने बायोडिझेलची अवैधरीत्या बिनबोभाट पणे विक्री सुरू आहे.
ईंधन दरवाढीने सामान्य जनता हैराण झाली आहे.गेल्या वर्षी सुमारे 75 रुपये प्रतिलिटर असलेल्या डिझेलने शंभरी पार केली आहे.त्यात मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने महागाई वाढली आहे.दरवाढीमुळे अक्कलकुवा तालुक्यात डिझेलऐवजी बोगस बायोडिझेलसदृश इंधन विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.पेट्रोल पंपावर मिळणारे डिझेल 104 च्या सुमारास असते तर बोगस बायोडिझेल 25 ते 30 रुपये स्वस्त असते. त्यामुळे डिझेल विक्रीत प्रत्यक्षात घट झाल्याचा अंदाज असून बायोडिझेलसदृश इंधनाची तालुक्यात आयात व विक्री अधिक वाढली आहे.लांब पल्याच्या मालवाहतूक गाड्या येथील हॉटेल्स व ढाब्यावर थांबतात ,तेथे सहजासहजी मिळणारे कमी दरातील बोगस बायोडिझेल त्यांना फायदेशीर ठरते.
दरम्यान जानेवारी महिन्यात अक्कलकुवा तालुक्यातील खापर परिसरातील ढाबा आणि हॉटेल्स मध्ये अवैधरित्या बिनबोभाट पणे बायोडिझेलची विक्री होत होती अनेक वेळा कार्यवाही करुन देखील बायोडिझेल विक्रेते प्रशासनाला जुमानत नव्हते म्हणुन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अक्कलकुवा पोलिसांना व महसूल प्रशासनाला हाताशी घेऊन खापर परिसरातील 5 हॉटेल्सवर धाडी टाकुन बायो डिझेल विक्री बाबत खातर जमा करुण येथील हॉटेल वरील अवैध बायोडिझेलचा डेपो प्रशासनाने जे.सी.बी यंत्राद्वारे नष्ट केला होता व काही ढाब्यावर भूमीअंतर्गत असलेल्या टाक्या काढून त्यांना ताब्यांत घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती.त्यामुळे अवैध बायो डिझेल विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. पोलीस व महसूल विभागाच्या सुस्त कारभारावर आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.अवैध बायोडिझेलची होत असलेली सर्रास विक्री कोणाच्या आशीर्वादाने ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

“अवैध बायोडिझेल विक्रेत्यांकडे प्रांत अधिकाऱ्यांनी धाड टाकण्याची परंपरेचा इतिहास कायम.अक्कलकुवा तालुक्यात पोलीस व महसूल विभाग निद्रा अवस्थेत असल्याची जाणीव वरिष्ठांना असल्याने अवैध बायोडिझेल विक्री होणाऱ्या हॉटेल्स व ढाब्यावर प्रांत अधिकारी यांनाच धाड टाकण्यासाठी यावे लागते.आता पुन्हा कारवाई साठी प्रांत अधिकारी येतात की तालुका प्रशासन सक्रिय होते हे औत्सुक्याचे ठरले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वनविभागाच्या पथकाने खैरजातीचे अवैध लाकूडसह ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

Next Post

अखेर महावितरणने घेतली तात्काळ दखल

Next Post
अखेर महावितरणने घेतली तात्काळ दखल

अखेर महावितरणने घेतली तात्काळ दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add