Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देहली प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू, प्रकल्पग्रस्तांनी कुणाच्या भूलथापांना बळी पडू नये: पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी

team by team
April 27, 2022
in राजकीय
0
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील देहली प्रकल्पा च्या प्रकल्पग्रस्तांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू, प्रकल्पग्रस्तांनी कुणाच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले आहे.
अक्कलकुवा तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या देहली प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते होते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 102 प्रकल्पबाधितांना जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक होते त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी आदिवासी विकास विभागाच्या सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत जमीन उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते. राज्याचे पाटबंधारे आणि त्याला संपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात आली होती त्यात आदिवासी विकास विभागाकडून देहली मध्यम प्रकल्पामुळे भूमिहीन झालेल्या 102 दारिद्र्यरेषेखालील असलेल्या भूमिहीन प्रकल्पबाधितांचे साठी सरकारी किंवा खाजगी जमीन उपलब्ध करून द्यावी उपलब्ध करून द्यावी त्यासाठी लागणारा खर्च आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे भूमिहीन असलेल्या प्रकल्पबाधितांचेसाठी एकूण 124 हेक्‍टर इतकी जमीन क्षेत्र आवश्यक होते.आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या प्रयत्नांनी अक्कलकुवा तालुक्यातील एकूण 92 हेक्‍टर खाजगी जमीन विक्रीसाठी उपलब्ध असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी संमती व इतर आवश्यक कागदपत्रे एकात्मिक आदिवासी प्रकल्प तरोडा यांच्याकडे सादर केले आहे उर्वरित सुमारे 32 हेक्टर खासगी जमीन खरेदीसाठी संमती देण्याचे काम प्रगतीपथावर आहे आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत जमीन संपादित करण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीतील नुसार कारवाई करण्यात येत असून जमिनीच्या मालकी हक्क निश्चित करण्यासाठी कायदेशीर शोध अहवाल प्राप्त करणे ,कर्जाचा बोजा असल्यास कमी करणे ,शेत्र सीमांकन करणे ,जमीन मालकासोबत वाटाघाटी करून दर निश्चित करणे अशा स्वरूपाची कामे जिल्हास्तरीय समिती करत आहे तसे प्रस्ताव आदिवासी विकास विभाग कडे सादर करण्यापूर्वी कागदपत्र पूर्ततेसाठी दोन-तीन महिने इतका कालावधी लागेल दरम्यान जलसंपदा विभागाकडून देहली मध्यम प्रकल्पाचे काम प्रगतीत करण्यात यावे प्रकल्प लवकर पूर्ण करण्यात यावा परिसरातील क्षेत्र सुजलाम् सुफलाम् होईल प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे आदिवासी विकास विभागाकडून जमीन खरेदी करण्यासाठी आठ कोटी 18 लाख रुपये तसेच सानुग्रह अनुदान साठी दोन कोटी पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येत असून एकूण प्रकल्पबाधितांना साठी 10 कोटी 23 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे 13 फेब्रुवारी रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी प्रकल्प बांधकाम सोबत बैठक घेतली त्यात त्यांनी प्रकल्पबाधितांच्या दोन्ही मागण्या मान्य केल्याचे घोषित केले तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा नियामक मंडळाच्या अहवालानुसार सानुग्रह अनुदान म्हणून दोन कोटी पाच लाख मंजूर करण्यात आले असून ही रक्कम प्रकल्पबाधितांना लवकर वाटप करण्यात यावी अशा सूचना आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना प्रगतीपथावर पूर्ण करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी पुढाकार घेतला असून देहली प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे भूमिहीन प्रकल्पग्रस्तांच्या सर्वच मागण्या पूर्ण झाले असून लवकरच त्यांना जमिनीही देण्यात येणार आहेत त्यामुळे धरणाच्या कामाला त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सिंधीदिगर घाटात चाऱ्याचे वाहन पलटी होवुन झाला अपघात,एक ठार तीन जण गंभीर जखमी, एका विरुद्धगुन्हा दाखल

Next Post

प्रा. डॉ .माधव कदम यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग

Next Post
प्रा. डॉ .माधव कदम यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग

प्रा. डॉ .माधव कदम यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add