नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे आज केंद्रासरकारच्या विरोधात भोंगा बजावो आंदोलन करण्यात येणार आहे.
दि.27 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा येथे भाजपा स्थित केंद्र सरकारच्या विरोधात डिझेल, पेट्रोल गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने ही सर्वसामान्य माणसाचे जगणे हे अतिशय कठीण झाले आहे म्हणून केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे भोंगा बजावो आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे असे नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी कळविले आहे.








