Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावधान : जिल्ह्यातील नागरीकांनी नंदुरबार सायबर सेलने दिला सतर्कतेचा ईशारा

team by team
April 27, 2022
in क्राईम
0
सावधान : जिल्ह्यातील नागरीकांनी  नंदुरबार सायबर सेलने दिला सतर्कतेचा ईशारा

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांनी ऑनलाईन त्वरीत कर्ज देण्याच्या ॲप्लीकेशन पासुन सावधान रहावे असा सतर्कतेचा ईशारा सायबर सेल नंदुरबार कडुन देण्यात आला आहे.
आजच्या आधुनिक युगात मोबाईल ही काळाची गरज बनलेली असुन लहानांपासुन वयोवृध्दांच्या हातात महागडे स्मार्टफोन आलेले आहेत . मोबाईलमुळे बरेचसे काम सोपे होते . मोबाईल व इंटरनेट चा वापर करुन बँकेत न जाता कमी वेळेत त्वरीत कर्ज या अमिषापोटी बरेच लोक आपल्या मोबाईल मध्ये विविध ॲप्लीकेशन डाऊनलोड केल्यामुळे सायबर जगतात बळी पडताना दिसत आहे . बरेचसे आर्थीक व्यवहार हे मोबाईलच्या विविध ॲप्लीकेशनद्वारे केले जातात , त्वरीत कर्ज देणारे मोबाईल ऍप्लीकेशन काही वेळेस नागरीकांच्या अडचणी वाढविण्याचे कारण ठरु शकतो . सध्या Apana Loan , Credit Money , Kishht , Cashbean Instant Personel Lone , Agile loan असे विविध प्रकारचे ॲप्लीकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन त्यावरुन त्वरीत कर्ज देण्याचे अमिष दाखवून सायबर गुन्हेगार नागरीकांना प्रलोभन देवुन असे अनोळखी ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडतात . तसेच सदर प्रकारातील पिडीत व्यक्ती ज्या वेळेस त्वरीत ऑनलाईल कर्ज देणारे ॲप्लीकेशन आपल्या मोबाईलमध्ये इंन्स्टॉल करतो . त्या वेळेस सदरचे ॲप्लीकेशन हे आपल्या मोबाईलचे गॅलरी मधील फोटो, व्हिडीओ , संपर्क क्रमांकांची यादी व आपल्या मोबाईलचा कॅमेरा याचे एक्सेस घेण्याचे परवानगी मागते . त्याशिवाय ते ॲप्लीकेशन इंन्स्टॉल होत नाही . ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन त्वरीत कर्ज घेतल्या नंतर ७ दिवसाचे आत सदरचे कर्ज जर परत केले नाही तर ॲप्लीकेशनचे मुळ मालक ऑनलाईन कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या संपर्क यादीतील लोकांना व्हॉट्सऍपद्वारे बदनामी कारक मॅसेजेस करुन पिडीताचे कर्ज परत फेड करण्यास सांगतात . त्यामुळे जपश्रळपश कर्ज घेतलेल्या नागरीकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो . अशा विविध प्रकारच्या तक्रारी नंदुरबार सायबर पोलीस ठाणे येथे प्राप्त झाल्या असून त्याबाबतचा तपास सुरू आहे . वरील सर्व कारणामुळे ऑनलाईन त्वरीत कर्ज देणारे ॲप्लीकेशन आपल्या मोबाईल मध्ये इंन्स्टॉल करु नये . कोणतेही ऑनलाईन कर्ज घेवु नये . यामुळे आपली फसवणुक होवु शकते .
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की , एखाद्या व्यक्तीला सायबर चोरट्यांनी फसवुन त्यांचे खात्यातुन पैसे काढुन घेतल्यास तात्काळ पोलीसांकडे तक्रार करावी . तसेच तात्काळ सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते . त्यामुळे ऑनलाईन फसवणुक झाल्यास नागरीकांनी तात्काळ जवळचे पोलीस ठाणे ऑनलाईन www.cybercrime.gov.in
यावर किंवा सायबर सेल , नंदुरबार येथे संपर्क साधावा . तसेच कोणतेही त्वरीत कर्ज देणारे ॲप्लीकेशन डाऊनलोड करु नये , अज्ञात नंबरवरुन पाठविलेली लिंक उघड्डु नये . तसेच मोबाईलवर आलेला बँकेचा ओटीपी शेअर करु नये . फेसबुकवर अनोळखी व्यक्तीकडुन ( विशेषत : महिलांकडुन ) आलेली फ्रेंड रिकवेस्ट स्विकार करु नये . यामुळे तुमची फसवणुक होवु शकते . अधिक सायबर माहीतीसाठी व जनजागृतीसाठी Twitter | वर @Cyberdost या अकाउंटला Follow करणे.तसेच t.me/cyberdosti4c या टेलिग्राम ग्रुपवर जॉईंट व्हावे असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

काँग्रेस पक्षातर्फे आज केंद्रासरकारच्या विरोधात भोंगा बजावो आंदोलन

Next Post

११२ डायलकरून खोटाफोन केल्याप्रकरणी युवकाविरूध्द गुन्हा

Next Post
११२ डायलकरून खोटाफोन केल्याप्रकरणी युवकाविरूध्द गुन्हा

११२ डायलकरून खोटाफोन केल्याप्रकरणी युवकाविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add