Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वुई द पीपल या प्रबोधनात्मक संगीतमय महानाट्यसह राज्यस्तरीय समता रत्न व समता भूषण पुरस्कार वितरण सोहळा समता युवा मंचतर्फे दिमाखात संपन्न

team by team
April 26, 2022
in सामाजिक
0
वुई द पीपल या प्रबोधनात्मक संगीतमय महानाट्यसह राज्यस्तरीय समता रत्न व समता भूषण पुरस्कार वितरण सोहळा समता युवा मंचतर्फे दिमाखात संपन्न

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील समता युवा मंच तथा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती कोरीट नाका परिसर वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती उत्सवानिमित्त दि. 25 एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी 7 वाजता कोरीट नाका परीसर येथे महाराष्ट्रातील ख्यातनाम लोकशाहीरा सीमा पाटील,गीत व संगीतकार जॉली मोरे प्रस्तुत “वुई द पीपल” या संगीतमय महानाट्याचा प्रबोधनात्मक प्रयोग मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी असंख्य जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला.


कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खा. डॉ. हिना विजयकुमार गावीत यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. विजयकुमार गावित, अमळनेर मतदारसंघाचे माजी आ. शिरिष चौधरी, नंदुरबार जि प सदस्या सुप्रिया गावित, नंदुरबार जि. प.सदस्य, मोहन शेवाळे, आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुंवर, काँग्रेस कमिटी राज्य संयोजक स्वरूप बोरसे, डॉ.राजेश वसावे, आरपीआय जिल्हा सरचिटणीस राम साळुंके, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, प्रवीण वाघ, सुरेंद्र ठाकरे, नगरसेवक गौरव चौधरी, चंद्रकांत नगराळे, सुनील गायकवाड, सुलभा महिरे, माजी नगरसेविका काश्मीरा बोरसे, सुरेंद्र ठाकरे, मोहन खानवाणी, प्रमोद शेवाळे कमल ठाकूर, रमाकांत पाटील, राकेश कलाल, नंदुरबार गटविकास अधिकारी सुवर्णा पवार, डॉ. सुनील वळवी, बापू साळवे ,संजय रगडे अनिल कुवर, सुरेंद्र कुवर, आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान दर सालाबादाप्रमाणे सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, आंबेडकरी चळवळ कला व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना 1)डॉ. राजेश वसावे सामाजिक, 2)चंद्रकांत नगराळे राजकीय आंबेडकरी चळवळ, 3)राकेश कलाल पत्रकारिता, 4)मोहन शेवाळे राजकीय, आंबेडकरी चळवळ 5)महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिति सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते समतारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार व जिल्हा विकासासाठी दिलेल्या अमूल्य योगदानबद्दल माजी मंत्री तथा आ.डॉ. विजयकुमार गावित यांना नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते समता भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी समता युवा मंच सर्व पदाधिकार्‍यांच्या वतीने सलग सहा वेळेस संसदरत्न पुरस्कार पटकाविलाबद्दल खा. डॉ.हिना गावित यांच्या जल्लोषात सत्कार करण्यात आला.
यावेळी सुवर्णा पवार, भाऊराव बिरारे, भैय्यासाहेब निकुंभे, विक्रांत खंडारे, रुग्णसेवक संतोष वसईकर, योगीराज गेजगे, पत्रकार भूषण रामराजे, आकाश पाने, ललित सूर्यवंशी यांचा खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन राम साळुंके, सुभाष पानपाटील, प्रवीण वाघ, किसन खांडेकर, सुलतान पिंजारी, जितेंद्र पानपाटील, सौरभ साळुंके, हर्षबोध बैसाणे, सिद्धार्थ साळुंके आदींनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष शिरसाठ, सिद्धार्थ मोरे, गौतम पानपाटील अशोक खांडेकर, ॲड. प्रेमानंद इंद्रजीत,राहुल रामराजे, रणवीर पेंढारकर, अविनाश मोरे, श्याम साळुंके, भरत शिंदे, विठ्ठल जाधव, दीपक पेंढारकर, मुकेश गुरव, अजय बागले, रत्नाकर पाटील, गणेश पवार, कृष्णा बोरसे, हितेश गायंके, किरण खोकले, तुकाराम चित्ते, अशोक शिरसाट, धनराज शिरसाट, रहीम शेख किरण गवळे, मंंगेश संदाशिव पिंटू इंदवे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पगारे यांनी केले. प्रास्ताविक सुभाष पानपाटील यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार नगरपालीकेत दोनशे करोडच्या भ्रष्ट्राचाराची भाजपची याचिका न्यायालयाने फेटाळली

Next Post

दुपारच्या रणरणत्या उन्हात नदीपात्रातील खडकाळ भागातून पळत जाऊन तहसीलदारांनी पकडली गौण खनिजाची अवैध वाहतूक

Next Post
दुपारच्या रणरणत्या उन्हात नदीपात्रातील खडकाळ भागातून पळत जाऊन तहसीलदारांनी पकडली गौण खनिजाची अवैध वाहतूक

दुपारच्या रणरणत्या उन्हात नदीपात्रातील खडकाळ भागातून पळत जाऊन तहसीलदारांनी पकडली गौण खनिजाची अवैध वाहतूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add