Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रभक्तीची भावना ठेवत एकोपातून जिल्ह्याचा विकास साधू या : ना.डॉ.मनसुख मांडविया

team by team
April 23, 2022
in राजकीय
0
राष्ट्रभक्तीची भावना ठेवत एकोपातून जिल्ह्याचा विकास साधू या :  ना.डॉ.मनसुख मांडविया

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा आकांक्षीत जिल्हा असून १९ क्रमांकावर आहे. शासकीय कर्मचारी, अशासकीय संस्था नागरीक सर्वांनी मिळून राष्ट्रभक्तीची भावना ठेवत आकांक्षीत जिल्हामुक्त होवू या, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याणमंत्री ना.डॉ.मनसुख मांडविया यांनी केले.
नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा.डॉ.हिना गावीत, जि.प.अध्यक्षा ऍड. सीमा वळवी, आ.डॉ.विजयकुमार, गावीत, आ.जयकुमार रावल, आ.राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ.मनसुख मांडविया पुढे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य, कृषी क्षेत्रात होत असलेले बदल सामाधानकारक आहे. यापुढे जिल्हाचास्तर उंचावण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास आकांक्षीत जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी आम्हाला पाठविले आहे. नंदुरबार जिल्हा आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीत १९ व्या क्रमांकावर आहे. तो प्रथम क्रमांकावर कसा येईल. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यापुढे आता जिल्ह्याचा विकासस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर संकल्पपूर्ण होतो. यासाठी प्रत्येकाने मानसिकरित्या तयार असले पाहिजे. वचनबध्दता व समर्पण हीच यशाची गुरूकिल्ली असल्याचे ना.डॉ.मांडविया म्हणाले. पुढे ते म्हणाले की, प्रत्येकाने जिल्ह्याचा विकासासाठी प्रयत्न केला तर राज्य आणि राष्ट्राचा विकास होणार आहे. प्रत्येकाला देशाच्या सीमेवर जावून लढवून राष्ट्रभक्ती सिध्द करायची नाही तर प्रत्येकाने आपली जबाबदारी केल्यास त्यातून देशसेवा करता येते. असे डॉ.मांडविया म्हणाले. २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. त्यामुळे मे महिन्यात रूग्णांचा शोध घेवून त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन डॉ.मांडविया यांनी केले. दरम्यान बैठकीचा सुरूवातीला प्रस्तावना करतांना जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी पीपीटिच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्प, कुपोषण मुक्तीसाठी प्रशासनाचे प्रयत्न, कृषीक्षेत्र व्यवसाय याबाबत माहिती दिली. यानंतर आयुष्यमान भारत योजनेचा कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या ना.डॉ.मांडविया यांचे सकाळी नंदुरबार शहरात आगमन झाले. यावेळी नवापूर चौफुली येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ.मांडविया यांनी जिल्हा रूग्णालयातील डायलिसेस सेंटर, पोषण व पुनर्वसन विभाग यासह विविध विभागांना भेटी दिल्या. त्यानंतर नांदर्खे येथील उपकेंद्र नंदुरबार शहरातील डिजीटल शाळा, कोळदा कृषी विज्ञान केंद्र आदी ठिकाणी भेटी देवून आढावा घेवून घेतला. यावेळी खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जि.प.सदस्या सुप्रिया गावीत, जिल्हाधिकारी मनिषा खत्री मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक चारूदत्त शिंदे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कोपर्ली येथे ग्रामिण रुग्णालयाला मंजूरी द्यावी, परिसरातील नागरिकांची केंद्रीय आरोग्य मंत्री ना.डॉ.मनसुख मांडविया यांच्याकडे मागणी

Next Post

नवापूर येथे एमआयडीसीसह विविध प्रकल्पांची डॉ.मनसुखभाई मांडवीया यांनी केली. पाहणी

Next Post
नवापूर येथे एमआयडीसीसह विविध प्रकल्पांची डॉ.मनसुखभाई मांडवीया यांनी केली. पाहणी

नवापूर येथे एमआयडीसीसह विविध प्रकल्पांची डॉ.मनसुखभाई मांडवीया यांनी केली. पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add