नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे ग्रामिण रुग्णालयाला मंजूरी द्यावी अशी मागणीचे निवेदन
विकासपर्व पॅनल व सांसद आदर्शग्राम ग्रामपंचायत
कोपर्ली यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री ना.डॉ.मनसुख मांडविया यांना दिले.तसेच यावेळी मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले
यावेळी खा. डॉ.हिना गावित, आ. डॉ विजयकुमार गावित, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, कोपर्लीचे सरपंच विनोद वानखेडे, बहाण्याने सरपंच छोटु राजपूत, ओसलीचे सुनिल गिरासे, अमळथे गावचे माजी सरपंच धनसिंग गिरासे तसेच कोपर्ली परिसरातील सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कोपर्ली हे गाव सर्वात मोठ गाव असून कोपर्ली गावाला तब्बल 15 गाव जोडली आहेत. तरी आमळथे ओसरली हाटमोहिदा जुनमोहिदा कढरे निभेल माजरे बहाण्याने ग्रामीण रुग्णालय होण्याबाबत महोदयांनी निवेदन स्वीकारत तात्काळ मंजुर करुण देण्याचे जाहिर केले. त्या बद्दल मंत्रिमहोदयांचे व ज्यांच्या विशेष प्रयत्नानी मंजुरीचा मार्ग मोकळा झाला त्या खा. डॉ.हिना गावित आभार मानले.










