Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोस्ट खात्यात ८२ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी पोस्टमास्टरला न्यायालयाने सुनावली तीन वर्ष कारावासाची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा

team by team
April 19, 2022
in Uncategorized
0
पोस्ट खात्यात ८२ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी पोस्टमास्टरला न्यायालयाने सुनावली  तीन वर्ष कारावासाची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा

नवापूर  | प्रतिनिधी
नवापूर पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजे धनराट येथील सन २००८ साली पोस्टमास्टर म्हणून कार्यरत असलेले गुलाब सुमन गावित यांनी पोस्ट खात्यात जमा करत असलेल्या ८१ हजार ६०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने न्यायालयांनी तीन वर्ष कारावासाची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की नवापुर तालुक्यातील धनराट गावातील परशुराम गावित यांनी पोस्टात त्यांच्या परिवारातील सहा सदस्यांचे दरमहा रुपये ५०० रुपये ६०० प्रमाणे बचत खाते उघडले होते या बचत खात्यांमध्ये परशुराम गावित यांनी दरमहा ५०० व ६०० रुपयांचा जून २००५ ते मे २००७ दरम्यान भरणा केला या भरणाची एकूण रक्कम ८१ हजार ६०० रुपये संबंधित पोस्ट मास्टर गुलाब सुमन गावीत यांनी संबंधित खातेदाराच्या खात्यात जमा न करता स्वतःकडे ठेवून अपहार केला या प्रकरणी सन २००८ साली सरकारतर्फे प्रताप सोनवणे यांनी पोस्टमास्टर गुलाब गावित त्यांच्याविरोधात भादवि कलम ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता पोलीस तपास अधिकारी ए.एन.सय्यद यांनी संपूर्ण तपास करत नवापूर येथील फौजदारी न्यायालयात पोस्टमास्टर गुलाब सुमन गावित यांच्याविरुद्ध दोषापत्र दाखल केले.सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.कोर्टात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी पोस्टमास्टर गुलाब सुमन गावित यांना नवापूर फौजदारी न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर.बी.बहिरवाळ यांनी आरोपीस तीन वर्ष कारावासाची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.दंडाची रक्कम न भरल्यास अधिक सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे सरकार पक्षातर्फे वकील अजय सुरळकर यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

गुजरात राज्यात अवैधपणे जाणारा विदेशी दारूसाठ्यासह दिड लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

विद्याश्रम परिसर विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग २०२१ साठी सज्ज, आज युवारंगचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add