नवापूर | प्रतिनिधी
नवापुर पोलिसांनी शहरातील लाईट बाजार भागात एका चारचाकी वाहनातून विनापरवाना गुजरात राज्यात अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणार्या विदेशी दारू साठ्यावर कारवाई करीत एक लाख ३२ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, चेतन सुरेशभाई मिस्तरी रा. आयोध्या नगर, भरूच हा नवापूर शहरात अवैधरित्या त्याच्या चार चाकी वाहन (क्र. जी.जे.०५,पी.पी.५८७०) मध्ये विदेशी दारू विनापरवाना अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने गुजरात राज्यात घेऊन जात असतांना नवापूर पोलिसांना याची बातमी लागली.नवापूर पोलिसांनी शहरातील लाईट बाजार भागात कारवाईत ५७ हजार ६०० रुपये किमतीच्या इंपिरियल ब्लू सुपरियर ग्रेन व्हिस्की ७५० ई-मेल एकूण ९६ काचेच्या बाटल्या आणि ७५ हजार रुपये किमतीची गोल्डन रंगाची झेन चार चाकी असा एकूण १ लाख ३२ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चेतन सुरेशभाई मिस्तरी याच्या विरोधात भादवि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र सोनवणे,पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास तावडे,पंकज सुर्यवंशी,विकी वाघ आदींच्या पथकाने केली आहे.