नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे शाळा पूर्व तयारी मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात ही आदिवासी कुलदेवता याहा मोगी माता यांच्या प्रतिमेचं पुजन करुन ढोल तासांच्या स्वरात सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक कर्मचारी यांच्या उपस्थित गावात मिरवणुक काढली. त्यासाठी गावात शैक्षणिक वातावरण निर्मिती तयार करण्याकरिता शाळेच्या परिसरात भव्य दिव्य मंडप टाकुन विद्यार्थी व पालकांच्या उपस्थित कार्यक्रम मोठ्या उत्साहाने सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता बार्टी संस्थेचे ब्रिजलाल पाडवी यांनी शालेय मुलांना शिक्षणाचे महत्व पटवुन दिले, तसेच प्रामुख्याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिदास पाटील यांनी मुलांचे बौद्धिक शारिरीक,मानसिक,विकास होण्यासाठी व शाळा पूर्व तयारी मेळाव्या कार्यक्रमाची रुपरेषा सविस्तर माहिती दिली.
शाळेचे मुख्याध्यापक बहादुरसिंग पाडवी यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना शिक्षणाबद्दल पूर्वज्ञान,मुलांची पडताडणी, साहित्याचा माध्यमातून कशाप्रकारे देता येईल याबद्दल मनोगत व्यक्त केले.
तसेच सदर कार्यक्रमात शालेय मुलांकडुन शाळेत नवीन प्रवेश घेण्यासाठी पूर्वज्ञान होईल त्यासाठी फळांचीओळख,फुलांची ओळख,प्राण्यांची ओळख, अकांची ओळख, मण्यांची रंग व मोजणे व राजधानी इत्यादी कृतीयुक्त कार्यक्रम करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोसऱ्या वसावे,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंद्रसिंग वसावे, काला वळवी प्राथ.शिक्षक,भिला पाडवी प्राथ.शिक्षक, ईश्वर तडवी प्राथ.शिक्षक, वज-या तडवी प्राथ.शिक्षक,केशव पाडवी प्राथ.शिक्षक, लिला वळवी प्राथ.शिक्षीका आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन निमजी वसावे यांनी मानले.








