नंदुरबार ! प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना लसीचे पाच लाख डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 14 लाख 93 हजार 720 लोकांना कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 4 लाख 11 हजार 273 नागरिकांनी (27.53 टक्के) लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 90 हजार 261 नागरिकांनी (6.04) दोन्ही डोस घेतले आहे. लसींचे असे एकूण 5 लाख 1 हजार 534 डोस देण्यात आले आहेत.
नंदुरबार तालुक्यात 18 ते 44 वयोगटातील 30 हजार 274 व्यक्तींनी पहिला डोस तर 6 हजार 961 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 68 हजार 862 व्यक्तींनी पहिला तर 23 हजार 140 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 3 हजार 514 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला आणि त्यापैकी 2 हजार 489 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. 9 हजार 444 कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर 2 हजार 959 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात असे एकूण 1 लाख 47 हजार 643 डोस देण्यात आले आहेत.
नवापूर तालुक्यात 18 ते 44 वयोगटातील 17 हजार 836 व्यक्तींनी पहिला डोस तर 694 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तर 45 वर्षावरील 54 हजार 975 व्यक्तींनी पहिला तर 5 हजार 437 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 2 हजार 478 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी 1 हजार 462 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. 10 हजार 626 कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर 1 हजार 812 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात असे एकूण 95 हजार 320 व्यक्तींना डोस देण्यात आले आहेत.
शहादा तालुक्यात वयोगटातील 18 ते 44 वयोगटातील 25 हजार 377 व्यक्तींनी पहिला तर 1 हजार 814 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तर 45 वर्षावरील 66 हजार 547 व्यक्तींनी पहिला तर 20 हजार 855 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 3 हजार 470 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी 2 हजार 42 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. 7 हजार 587 कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर 2 हजार 690 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात असे एकूण 1 लाख 30 हजार 382 डोस देण्यात आले आहेत.
तळोदा तालुक्यात 18 ते 44 वयोगटातील 12 हजार 201 व्यक्तींनी पहिला डोस तर 1 हजार 529 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तर 45 वर्षावरील 27 हजार 192 व्यक्तींनी पहिला तर 6 हजार 692 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 1 हजार 800 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी 692 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. 3 हजार 211 कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर 1 हजार 386 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात असे एकूण 54 हजार 703 डोस देण्यात आले आहेत.
अक्कलकुवा तालुक्यात 18 ते 44 वयोगटातील 7 हजार 456 व्यक्तींनी पहिला डोस तर 419 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तर 45 वर्षावरील 23 हजार 250 व्यक्तींनी पहिला तर 2 हजार 51 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 1 हजार 919 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी 1 हजार 52 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. 6 हजार 270 कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर 1 हजार 382 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात असे एकूण 43 हजार 799 डोस देण्यात आले आहेत.
धडगाव तालुक्यात 18 ते 44 वयोगटातील 8 हजार 662 व्यक्तींनी पहिला डोस तर 249 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तर 45 वर्षावरील 11 हजार 813 व्यक्तींनी पहिला तर 1 हजार 30 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 2 हजार 429 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी 874 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. 4 हजार 80 कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर 550 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात असे एकूण 29 हजार 687 डोस देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 रोजी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्याने 22 एप्रिल रोजी लसीकरणाचा एक लाखाचा, 12 मे रोजी दोन लाख,9 जून रोजी तीन लाख, आणि 1 जुलै रोजी चार लाखाचा टप्पा पूर्ण केला.
कोरोना पासून संरक्षणासाठी नागरिकांनी कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे आणि लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
*जिल्ह्यातील एकूण लसीकरण*
*आरोग्य कर्मचारी (पाहिला डोस) -15 हजार 610*
*आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस) -8 हजार 611*
*कोरोना योद्धा कर्मचारी (पहिला डोस )- 41 हजार 218*
*कोरोना योद्धा कर्मचारी (दुसरा डोस )- 10 हजार 779*
*18 ते 44 वयोगटातील (पहिला डोस )- 1 लाख 1 हजार 806*
*18 ते 44 वयोगटातील (दुसरा डोस )- 11 हजार 666*
*45 वर्षावरील वयोगटातील ( पहिला डोस )- 2 लाख 52 हजार 639*
*45 वर्षावरील वयोगटातील ( दुसरा डोस )- 59 हजार 205*
* नंदुरबार जिल्ह्यात एकूण लसीकरण – 5 लाख 1 हजार 534*