Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात आज आरोग्य मेळाव्याचे आयोजन, शिबिरात आरोग्याच्या विविध योजनांचे कार्ड बनवण्यात येणार

team by team
April 18, 2022
in आरोग्य
0
म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात आज आरोग्य मेळाव्याचे आयोजन, शिबिरात आरोग्याच्या विविध योजनांचे कार्ड बनवण्यात येणार

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालय येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय भारत सरकार व आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित भव्य मोफत आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे सदर आरोग्य मेळावा दि.18 एप्रिल सोमवार रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी या शिबिरात लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागा मार्फत करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक आदिवासी विकास मंत्री ॲड. के..सी.पाडवी हे असतील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमाताई वळवी तर प्रमुख उपस्थिती म्हणून नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे खासदार ॲड. हिनाताई गावित, प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे सदस्य डॉ. विजयकुमार गावित व शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी हे आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती सभापती अजित नाईक, कृषी तथा पशुसंवर्धन सभापती गणेश पराडके,जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, जिल्हा परिषद सदस्या रजनी नाईक, जि.प.सदस्या हेमलता शितोळे, जि.प. सदस्य मोहन शेवाळे, जि.प. सदस्या वंदना पटले, जि.प.सदस्या मंगलाबाई जाधव,जि.प. सदस्या कविता पावरा, जि. प.सदस्या ऐश्वर्यादेवी राहुळ, जि.प.सदस्य सुभाष पटले, जि प सदस्य मोगरा पटले, जि.प. सदस्या जयश्री पाटील, जि.प.सदस्या मीनाताई ठाकरे,जि.प,सदस्या भारती भील, जि.प.सदस्या गुलाल भिल, जि.प.सदस्या कुंदाबाई नाईक,शहादा पंचायत समिती सभापती श्रीमती बायजाबाई भील, उपसभापती श्रीमती वैशाली पाटील, पंचायत समिती सदस्या श्रीमती कमलबाई ठाकरे हे उपस्थित राहणार आहे.
तर अतिथी गण म्हणून नंदुरबार जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे, नंदुरबार प्रकल्प अधिकारी मिनल करणवाल, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक डॉ.रघुनाथ भोये हे असतील.
शहादा तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय म्हसावद तेथे दंत व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरात नंदुरबार जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय विद्यालयातील तज्ञ डॉक्टर (स्पेशालिस्ट) तपासणी व शास्त्रक्रिया करणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराच्या लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
डिजिटल आयडी युनिक हेल्थ , महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे दोन्ही योजनाचे कार्ड बनविण्यासाठी खालील कागदपत्रे आणावी त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे दोन फोटो,केशरी व पिवळे रेशन कार्ड, आधार कार्ड,मतदान कार्ड व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत.प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड बनविणे वाटप करणे अवयवदान बाबत जनजागृती करणे, योगा शिबिर जनजागृती करणे डिजिटल आयडी,रक्तदान शिबीर आयोजित केले आहे तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग नंदुरबार यांच्याकडून करण्यात आले आहे.वरील कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी,शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अधिकारी डॉ.राजेन्द्र ठाकरे,म्हसावद ग्रामीण रुग्णालया चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अल्लाउद्दिन शेख व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात जास्तीस जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन म्हसावद ग्रामीण रुग्णालया चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अल्लाउद्दिन शेख व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

लायन्स फेमिना क्लब वर १२ अवॉर्डसचा वर्षाव:समाजकार्याचा झाला उचित गौरव

Next Post

ढंढाणे- रनाळे दरम्यान भरदुपारी दुचाकीस्वाराला मारहाण करून सव्वा दोन लाख चोरट्यांनी लांबविले

Next Post
शिरसाणी येथे दोघांना मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

ढंढाणे- रनाळे दरम्यान भरदुपारी दुचाकीस्वाराला मारहाण करून सव्वा दोन लाख चोरट्यांनी लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add