नंदूरबार l प्रतिनिधी
डाकिणीच्या संशयावरून महिलेला विवस्त्र करून छळ करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.व्हिडीओतील बोली भाषेवरून तो व्हिडिओ जळगाव परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी पुरोगामी म्हणावणाऱ्या महाराष्ट्रात उत्साहात घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असतांना धडगाव, मोलगी,अक्कलकुवा परीसरात महिलेला डाकिणीच्या संशयावरून नग्न करून तिचा छळ करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.व्हिडीओतील भाषा समजून घेतली असता व्हिडीओ धडगाव मोलगी,अक्कलकुवा, तळोदा परिसरात काही सामाजिक कार्यकर्त्यांचा व्हाट्सएपवर एक महिलेला नग्न करून तिला डाकीण तिला त्रास दिला जात असल्याचा व्हिडिओ धडकला.व्हिडीओ मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिडीओ कुठला आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
व्हिडीओ मध्ये तुम्ही किती जणी ‘डाकीण आहेत,किती जणांना खाल्लं आहे’ असा जाब विचारत आहे.आजू बाजूला उभे असणारे युवक तिला चटके देण्याचे किंवा काही तरी पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हा प्रकार समजल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या अक्कलकुवा शाखेचा कार्याध्यक्ष सुमित्रा वसावे यांनी देखील घटनेचा पाठपुरावा केला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी धडगाव मोलगी परिसरात फिरून ही घटना नेमकी कुठली आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात महाराष्ट्र अंनिसच्या नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या संदर्भात घटनेचा शोध घेण्याच्या व कारवाई करण्याबाबत मागणी करण्याचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिस प्राप्त झालेली आहे. पोलिसांनी देखील याबाबत तात्काळ हस्तक्षेप करून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याची मत सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत धडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्याशी संपर्क साधून व्हिडिओ बाबत विचारणा केली असता त्यांच्या पर्यंत कुठलाही व्हिडिओ अथवा माहिती प्राप्त नसल्याचे सांगितले.
नंदूरबार जिल्ह्यातील डाकीणी प्रथेची दाहकात सर्वश्रुत आहे.अनेक महिला या डाकीण प्रथेला बळी पडत असल्याचा घटना सातत्याने समोर येत असतात.प्रत्येक महिण्याला धडगाव,मोगली पोलिस ठाण्यात एक तरी डाकीण प्रकरणाचा गुन्हा दाखल होत असल्याची स्थिती आहे.
14 एप्रिल रोजी हा व्हिडीओ व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळाला घटनेची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र एकविसाव्या शतकात देखील अशा पद्धतीचे अघोरी व अमानवी प्रकार घडत असतील तर याबाबत सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा सर्व संघटना प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे घडलेला प्रकार अत्यंत किळसवाणा असून मानवतेला काळीमा फासणारा आहे.डाकींण प्रथेच्या विरोधात विविध संस्था-संघटना पातळीवर तसेच प्रशासकीय पातळीवर व्यापक प्रबोधन होणे गरजेचे आहे.
सुमित्रा वसावे,कार्याध्यक्ष
महाराष्ट्र अनिस अक्कलकुवा शाखा
घडलेला प्रकारासंदर्भात ती घटना नेमकी कुठली आहे याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जाईल.अत्यंत गंभीर प्रकार असून दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
गोकुळ औताळ
पोलीस निरीक्षक, धडगांव








