नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील कैजाला येथे ऊसनवार दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन एकावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील डनेलचा वाजवापाडा येथील सामा सोत्या पाडवी यांनी बावा शिवा वळवी रा.कंजाला ता.अक्कलकुवा यांना चार वर्षापूर्वी ऊसनवार दिलेले एक हजार रुपये परत मागितले. याचा राग आल्याने सामा पाडवी यांना बावा वळवी याने धारदार शस्त्राने डाव्या पायाच्या गुडघ्यावर मारुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सामा पाडवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात बावा वळवी याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अरुण सैंदाणे करीत आहेत.








