तळोदा l प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तर्फे राज्यभरात घेतली जाणारी गांधी विचार परीक्षा जानेवारी 2022 मध्ये घेण्यात आली. परीक्षेत एकूण 178 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या परीक्षेचा नुकताच निकाल आला असून विद्यामंदिरातील इ.11वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु.निकिता भिका दातीर हिचा कनिष्ठ महाविद्यालय गटात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला तर माध्यमिक गटातून भावेश इच्छाराम बैसाणे इ.8 वी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक व तृप्ती रमेश वळवी इ.10 वी तृतीय क्रमांक आला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आय. पी. बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष निखिल तुरखिया, संचालिका सोनाबेन तुरखिया, उपाध्यक्ष डी.एम.महाले, सचिव संजय पटेल ,समन्वयक हर्षिल तुरखिया ,प्राचार्य सुनिल परदेशी,मुख्याध्यापिका भावना डोंगरे, शिक्षक सौ.रेखा मोरे, रविंद्र गुरव,सचिन पंचभाई , प्रा.मिलिंदकुमार पाटोळे यांनी अभिनंदन केले.