तळोदा l प्रतिनिधी
महाराष्ट्र व गुजरात हद्दीचा सीमेवर आढळून आलेला बिबट्याचे 10 दिवसाचे बछ्डे अथक प्रयत्नानंतर ही आईला न भेटू शकल्यामुळे अखेर त्यास वेद्याकिय अधिकारी देखरेखीत जुनागड येथील उद्यानात रवाना करण्यात आल्याची माहिती गुजरात वनविभागाने दिली आहे. असल्याच सांगण्यात आले .
सात दिवस पूर्वी बहुरूपा शिवारात 10 दिवसाचे बिबट्याच पिल्लू आढळले होते. तळोदा व गुजरात येथील वन विभाग कडून मादीकडे सुरक्षित पोहचविण्यासाठी दिवसरात्र परिश्रम सुरु होते. मात्र बिबट्या मादी त्या पिल्लास घेण्यासाठी आलीच नसल्याने अखेर पिल्लाचा सुरक्षेच्या विचार लक्षात घेता वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेऊन त्या पिलास जुनागड येथील अभय अरण्यात पाठविण्याचा निर्णय घेतला. सहायक उप वन संवरक्षक आनंद कुमार यांच्या मार्गदर्शन खाली वनक्षेत्रपाल एस.आर वासावा, ए. एम गाठी, सतीश गावित यांनी सदर पिल्लास जुनागड येथील अभय अरण्यात सुखरूप रवांना केले आहे .