नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात काल दिवसभरात चार जण कोरोनामुक्त झाले . यामध्ये नंदुरबारातील दोन , शहादा एक व नवापूरातील एका जणाचा समावेश आहे . दरम्यान , जिल्ह्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरणारा शहादा तालुका धडगावनंतर कोरोनामुक्त झाला आहे . तर गेल्या महिन्यात कोरोनामुक्त असणाऱ्या अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक पाच इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत . नंदुरबार जिल्ह्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे .
नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत २ लाख २७ हजार १४ ९ संशयित रुग्णांची स्वब तपासणी करण्यात आली आहे . त्यापैकी १ लाख ८५ हजार ९ २२ रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे . ३७ हजार ६ ९९ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत तर ३६ हजार ७४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत . आतापर्यंत जिल्हयात ९ ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे . सध्या ९ रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत . दरम्यान , जिल्हयातील ४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आज कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे . यात नंदुरबार तालुक्यातील २ तर शहादा व नवापूर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे . यासोबतच शहादा तालुक्यात अखेरचा कोरोना रुग्ण बरा झाल्याने शहादा तालुका तुर्तास कोरोनामुक्त झाला आहे . यापुर्वी अक्कलकुवा व धडगाव हे दोन्ही तालुके कोरोनामुक्त झाले होते . परंतू दोन दिवसांपुर्वी अक्कलुवा तालुक्यातील टाकळीगव्हाळी येथे एकाच दिवशी पाच रुग्ण आढळले आहेत . त्यामुळे सध्या शहादा व धडगाव हे दोन्ही तालुके कोरोनामुक्त झाले आहेत . सध्या जिल्हयात ९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत . यात नंदुरबार व नवापूर तालुक्यातील प्रत्येकी १ , तळोदा तालुक्यातील २ तर अक्कलकुवा तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे . त्यामुळे नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे .