Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
April 13, 2022
in कृषी
0
खरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी
येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते,कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषि निवष्ठा सनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी त्याबोलत होत्या. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी एल.डी.भोये, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक बी.जी.कोटकर, मोहिम अधिकारी महेश विसपुते, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी योगेश हिवराळे, एकनाथ कदम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, खरीप हंगाम 2022-2023 साठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन येणाऱ्या बियाणे चांगल्यार दर्जाची असावेत. प्रत्येक विक्रेत्याने साठा तसेच दर दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावावेत. साठा रजिष्टर नोंदवह्या अद्यावत ठेवाव्यात. रासायनिक खते विक्रेत्यांनी पीओएस मशिनद्वारेच खताची विक्री करावी. खताची विक्री शासकीय दरानेच करावी. जादा दराने विक्री बियाणे,खते तसेच कृषि निविष्ठा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. युरीयाचा वापर कमी होणसाठी नॅनो युरियाचा वापर वाढविण्यावर भर देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी प्रत्येक दुकानात नॅनो युरिया वापरा बाबतचे जनजागृतीपर फलक लावण्यात यावेत. शेतकऱ्यांच्या मागणी नुसार बियाणे विक्रेत्यांनी हिरवळीच्या खताच्या बियाणे उपलब्ध करुन द्यावे. सेंद्रीय खताचा कंपोस्ट, गांडुळ खत, जिवाणु खते वापरण्यासाठी जनजागृती करावी.
यावेळी श्री.भागेश्वर म्हणाले की, खरीप हंगाम 2022 साठी भात,मका,ज्वारी,बाजरी,सोयाबीन व इतर बियाण्यांसाठी 22 हजार 620 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तर बी.टी कापूस बियाण्यासाठी 6 लाख 25 हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी 3 हजार 30 मे.टन युरिया व 590 मे.टन डि .ए.पी. संरक्षितसाठा मंजूर केला आहे. खरीप हंगामासाठी 1 लाख 34 हजार 800 मे.टन रासायनिक खताची मागणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याबैठकीस खते,बियाणे विक्रेते व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन 18 वर्षीय युवतीची आत्महत्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

Next Post
भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add