नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिस ठाणे हद्दीतील निंबीपाडा शिवारात 18 वर्षीय अनोळखी युवतीने आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा
तालुक्यातील मोलगी पोलिस ठाणे हद्दीत दि.९ ते 10 एप्रिल रोजी एक अनोळखी मुलगी वय अंदाजे 18 वर्ष हिने निंबीपाडा गावाला लागून असलेले जंगलात आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.याबाबत अधिक अशी की, यातील मयत युवती ही अक्कलकुवा तालुक्यातील जमानाचा मोखागव्हाणपाडा येथील होती. सदर युवतीला
ओन्या ऊर्फ अनिल खोजल्या वसावे रा.मोलगीचा निंबीपाडा ता . अ.कुवा याने युवतीला घरी घेवून जावून तीस सोबत ठेवण्यास नकार दिला तेव्हा मयत मुलगी हिने नैराश्यापोटी मोलगीचा निंबीपाडा गावी आंब्याच्या झाडाला ओढणीचे सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती.याप्रकरणी
युवतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्यादीवरून ओन्या ऊर्फ अनिल खोजल्या वसावे याच्या विरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई जितेंद्र वाघ करीत आहेत.