Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे 19 ते 23 एप्रिल दरम्यान युवारंग चे आयोजन, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 77 महाविद्यालयांचा सहभाग

team by team
April 13, 2022
in शैक्षणिक
0
शहादा येथे 19 ते 23 एप्रिल दरम्यान युवारंग चे आयोजन, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 77 महाविद्यालयांचा सहभाग

शहादा । प्रतिनिधी

येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय व कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.19 ते 23 एप्रिल दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावतर्फे आंतर महाविद्यालय युवक महोत्सव-युवारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 एप्रिलला सकाळी आठ वाजता कुलगुरू डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते युवारंग महोत्सवाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, युवारंग महोत्सव समितीचे समन्वयक डॉ.ईश्वर पाटील, प्रा.नेत्रदीपक कुवर उपस्थित होते.
महोत्सवात सहभाग घेणार्‍या महाविद्यालयांचे रजिस्ट्रेशन 19 एप्रिलला होणार आहे. 20 एप्रिलला सकाळी आठ वाजता पाच रंगमंचावर 28 कला प्रकार सादर होतील.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात रंगमंच यांना स्वातंत्र्यसेनानी यांची नावे देण्यात आलेली आहेत. रंगमंच क्रमांक 1 ला स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब पी.के. पाटील, बंदिस्त रंगमंच क्रमांक दोन बाल हुतात्मा शिरीषकुमार रंगमंच, बंदिस्त रंगमंच क्रमांक तीन हुतात्मा लालदास शहा रंगमंच, बंदिस्त रंगमंच क्रमांक चार वीर भगतसिंग रंगमंच, बंदिस्त रंगमंच क्रमांक पाच वीर बिरसामुंडा रंगमंच अशी आहेत.
महाविद्यालयाला तिसर्‍यांदा विद्यापीठस्तरीय युवारंगचे यजमानपद मिळाले आहे. महाविद्यालयातर्फे सर्व सुविधांनी सज्ज असे आयोजन केले जाते.आतापर्यंत सर्वच कार्यक्रम यशस्वीपणे राबवले असल्याने यजमान पद दिले आहे असे मकरंद पाटील यांनी सांगितले.

77 महाविद्यालयांचा सहभाग
प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार यांनी युवारंग महोत्सवासाठी 19 समित्या बनविल्या आहेत. मुलींसाठी निवासाची सोय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात तर मुलांसाठी सांदिपनी वस्तीगृहात केली आहे. भोजनाची व्यवस्था कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारातच केली आहे. आतापर्यंत 70 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला आहे.व्यवस्थापकांना सह एकूण 916 विद्यार्थ्यांची संख्या झाली आहे.धुळे जिल्ह्यातील 24, नंदुरबार 20 व जळगाव जिल्ह्यातील 33 अश्या 77 महाविद्यालयांनी नोंद केली आहे. वक्तृत्व स्पर्धांबाबत आदल्या दिवशी सहभाग घेणार्‍यांना विषय दिला जाईल.परीक्षकांही नियुक्ती विद्यापीठ करणार. विद्यापीठाच्या बाहेरील परीक्षक नियुक्त केले जातील. या युवारंग महोत्सवात एकूण 28 कला प्रकार असतील.
23 एप्रिलला सकाळी 10 वाजता रंगमंच क्रमांक एक वर पारितोषिक वितरण आणि समारोप सोहळा राहील. समारोपाच्या कार्यक्रमाला सेलिब्रिटींना आमंत्रित केला जाण्याच्या प्रयत्न आहे. उन्हाळा असल्याने खुल्या रंग मंचावरील स्पर्धा सकाळी सात ते बारा तर दुपारी चार ते उशीरा रात्री पर्यंत राहतील. बंदिस्त रंगमंचावर कार्यक्रम दिवसभर सुरू राहतील.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासाबरोबर त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा प्रोत्साहन मिळावे म्हणून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2011 मध्ये विद्यापीठस्तरीय युवारंग संपन्न झाला होता. दोन वर्ष कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद होते. त्यामुळे चांगला उत्साह आहे असे मकरंद पाटील यांनी सांगितले. सर्वांनी युवारंग महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील व समन्वयक मकरंद पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वाळूचे लिलाव सुरू करण्याचे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

Next Post

शहादा आगारात इंधन बचत कार्यक्रम उत्साहात

Next Post
शहादा आगारात इंधन बचत कार्यक्रम उत्साहात

शहादा आगारात इंधन बचत कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add