नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र लगोरी असोसिएशनच्या मान्यतेने व ऑल नंदुरबार जिल्हा लगोरीअसोसिएशनच्यावतीने ९ वी वरिष्ठ गट पुरुष लगोरी राज्य अजिंक्यपद स्पर्धा २०२२ चे आयोजन नंदुरबार येथे दि.९ते
१० एप्रिल२०२२ के.आर.पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य उपसंचालक नाशिक विभागीय सुनंदा पाटील यांच्या हस्ते व प्रसिद्ध उद्योगपती , चेअरमन किशोर वाणी यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
या स्पर्धेेला प्रमुख अतिथी म्हणून व्हा.चेअरमन सिघ्दार्थभाई वाणी, जिल्हा संघटकचे अध्यक्ष राजेश परदेशी, महाराष्ट्र लगोरी असोसिएशनचे सचिव भरत गुरुव, महाराष्ट्र जम्परोप असोसिएशनचे उपाध्यक्ष कैलाश कंखरे, के.आर.पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापक डॉ .छाया शर्मा, उपमुख्याध्यापक डॉ .नदीम शेख, लगोरी जिल्हा संघटकचे उपाध्यक्ष डॉ.दिनेश बैसाणे, जिल्हा सचिव रामा हटकर , प्रकाश पाटील, संदिप गुरव आदी उपस्थित होते. स्पर्धेत एकुण १० जिल्ह्यातील मुलांचे संघ सहभागी झाले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना राज्य सचिव भरत गुरुव म्हणाले की, नंदुरबारला आजपर्यंत लगोरी चषक ९ वी राज्यस्तरीय अतिशय उत्तम आयोजन नंदुरबार जिल्हा संघटना नेहमीच करते. व आता शालेय स्पर्धेमध्ये लगोरी खेळाच्या समावेशा मुळे खेळाडूंना लगोरी खेळात उत्तम संधी प्राप्त होणार आहे. स्पर्धेत पंच म्हणून योगेश बेदरकर ,विशाल जाधव , पाटील सर, विशाल पवार ,मोहन सोपनर , गणेश सुळे ,अनुश ठाकुर ,प्रतिक जैन यांनी काम पाहिले . स्पर्धेचे प्रास्ताविक संतोष कुलकर्णी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मयुर ठाकरे यांनी केले व आभार ऑल नंदुरबार जिल्हा लगोरी असोसिएशन सचिव रामा हटकर यांनी मानले.










