नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन करीत प्रेस मारुती मंदिरासमोर मोटार सायकल रॅली काढल्याप्रकरणी १५० जणांविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करीत व प्रशासनाची परवानगी न शहादा येथील प्रेस मारुती मंदिरासमोर घेता मोटार सायकल रॅली काढण्यात आली. याबाबत पोना.दत्तात्रेय जिबाबराव बागल यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात राजा उर्फ राजेंद्र साळी, चंद्रकांत उर्फ गुड्डू पवार, धिरुभाई पटेल, केशव पाठक, प्रशांत पाटील, मनिष चौधरी, नरेंद्र वाडीले, वैभव उर्फ विक्की तांबोळी, प्रदिप उर्फ आबा चौधरी, नितीन तिरमले, राधेश्याम निकम, अजिंक्य जव्हेरी, विक्की चौधरी, निलेश सिंधी, कुशल धनानी, नितीन तिरमले, पंकज सोनार, विनोद जैन, भटू भोई, अक्षय अमृतकर, नितीन गुरव, पुष्कर जोशी, मारी उर्फ मोहित पाटील, वैभव भावसार, सनी उर्फ पराग सोनार, अक्षय चौधरी, बाबा पानपाटील, किशोर पाटील, प्रदिप चौधरी, अप्पु पाटील, विठ्ठल बच्छाव यांच्यासह १५० जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक माया राजपूत करीत आहेत.










