म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील
लोणखेडा येथे राम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख येजमान म्हणून विलास दशरथ पाटील यांनी सपत्नीक पूजा-अर्चा केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.या प्रसंगी माजी उपसरपंच अशोक टिला पाटील, माजी उपसरपंच भरत तुकाराम पाटील, माजी उपसरपंच अरुण विठ्ठल पाटील, पोलीस पाटील युवराज एकनाथ पाटील तसेच श्रीराम सेवा समितीचे संजय देविदास पाटील, दिलीप श्रीपत पाटील, विलास खंडेराव पाटील, बापू सोनार, घनश्याम पाठक, दिनेश पाटील, उमेश पाटील, योगेश पाटील, आदी उपस्थित होते तसेच जय देवा ग्रुपने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.










