नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील चौपाळे येथील के.आर. पब्लिक स्कूल येथे आज दि. ९ एप्रिल रोजी के.आर. चषक ९ वी राज्यस्तरीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा 2022 चे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योगपती, के.आर.पब्लिक स्कूलची चेअरमन किशोर वाणी तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून क्रीडा उपसंचालक क्रीडा व युवक संचालनालय नाशिक विभाग सुनंदा पाटील असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस चेअरमन सिद्धार्थ वाणी, नंदुरबार जिल्हा लगोरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश परदेशी, महाराष्ट्र लगोरी असोसिएशनचे सचिव भरत गुरव, सहसचिव संदीप गुरव,राज्य उपाध्यक्ष कैलास कंखरे तर प्रमुख उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष डॉ. दिनेश बैसाने, क्रीडा संघटक डॉ. मयुर ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत.
दि.९ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेला के.आर. पब्लिक स्कूल चौपाळे येथे के.आर.चषक ९ वी राज्यस्तरीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा 2022 चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.उपस्थितीचे आवाहन प्रिन्सिपल डॉ. छाया शर्मा, व्हा. प्रिन्सिपल डॉ.नदीम शेख, मॅनेजर डॉ. संतोष कुलकर्णी, क्रीडा शिक्षक योगेश बेदरकर, निशांत जगताप, चंद्रकांत कासार आदींनी केले आहे.








