Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथून साडे पाच लाखाच्या स्पीरीटसह ६ लाखाची कार जप्त,दोघांविरूध्द गुन्हा, एकास अटक

team by team
August 1, 2021
in क्राईम
0
म्हसावद येथून साडे पाच लाखाच्या स्पीरीटसह ६ लाखाची कार जप्त,दोघांविरूध्द गुन्हा, एकास अटक
नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दारु बनविण्याचे विषारी स्पीरीट वाहतुकीवर कारवाई करीत ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे एकुण २२०० लिटर स्पिरीट व ६ लाख रुपये किमतीची महींद्रा बोलेरो चार चाकी वाहन जप्त केले असुन दोघांविरूध्द गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ३० जुलै रोजी रोजी धुळे येथुन नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावाकडे चारचाकी वाहनातुन दारु बनविण्यासाठी उपयोगी येणारे स्पीरीटची वाहतुक होणार असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दि.३० जुलै  रोजी शहादा शहरातील लोणखेडा येथील लाईफ केअर हॉस्पीटजजवळ सापळा लावला . सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास म्हसावद गावाच्या दिशेला एक महिंद्र बोलेरो वाहन भरधाव वेगाने येतांना दिसल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला संशय आला म्हणून पथकातील कर्मचार्‍यांनी हात देवुन वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेला , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची खात्री झाल्याने त्यांचा पाठलाग करुन शिताफीने वाहन ताब्यात घेतले . पथकाने  वाहनाची तपासणी केली असता त्यात बनावट दारु बनविण्याकामी उपयोगी पडणारे ५ लाख ५० हजार रुपये किमंतीचे एकुण २२०० लिटर स्पिरीटने भरलेल्या ११ प्लास्टीकच्या टाक्या आढळुन आल्या , त्यांना परवाना आहे काय असे विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे  सांगितल्याने , ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे एकुण २२०० लिटर स्पिरीट व ६ लाख रुपये किमतीची महींद्रा बोलेरो चार चाकी वाहन (क्रमांक एम.एच.४३,डी.२५६०) असा एकुण ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन दोन्ही संशयीत आरोपी चालक व क्लिनर  शाहरुख नजिर मण्यार रा . म्हसावद ता . शहादा जि . नंदुरबार, बाळु महादु डामरे रा . अभय कॉलेज रोड , धुळे यांच्या विरुध्द शहादा पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला . असुन शाहरुख नजिर मण्यार याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित , अपर देवराम गवळी , स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर , पोहेकॉ दिपक गोरे , पोलीस नाईका विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार , पोलीस अमलदार विजय ढिवरे , शोएब शेख , रामेश्वर चव्हाण यांचे पथकाने केली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी संपुर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

पुण्यात आढळला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण

Next Post

शहादा तालुक्यातील येथे एकाच कुटुबातील तीघांची आत्महत्याप्रकरणी दोघा महिलांना अटक

Next Post
शहादा तालुक्यातील लोंढरे येथे एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

शहादा तालुक्यातील येथे एकाच कुटुबातील तीघांची आत्महत्याप्रकरणी दोघा महिलांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add