Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोठली व घोटाणे येथील चोरीचे गुन्हे उघड, मुद्देमालासह ३ जणांना अटक

team by team
April 8, 2022
in क्राईम
0
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील कोठली, घोटाणे येथील चोरीचे गुन्ह्यातील मुद्देमालासह ३ संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि .२९ रोजी रात्री ११.३० ते दि . ३० मार्च २०२२ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील कोठली गावातील शशिकांत अरविंद पाटील यांचे कोठली खुर्द शिवारातील शेतातील घरात उघडया दरवाज्यातून घरात प्रवेश करून २७ हजाराचे ३ मोबाईल फोन . ५० हजार चोरून नेले म्हणुन अज्ञात आरोपीविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . तसेच दि.९ ते दि . १० मार्च २०२२ दरम्यान नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील घोटाणे गावातून तुळशिराम दगा पाटील यांच्या घराचे मागील बाजु अंगणातून ७० हजाराची मो . सा .( क्र . एम.एच – ३९, ए.के – २३७८ ) ३ हजाराचा मोबाईल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेला म्हणून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली वर नमुद दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे त्यांच्या शाखेमार्फत करीत होते . तपासादरम्यान पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, घोटाणे गावातील चोरीचे गुन्ह्यातील मोबाईल जामदा ता . साक्री येथील राहणारे व सध्या सुरत येथे वास्तव्यास असलेले धर्मा स्टील भोसले व नानु डींग भोसले यांनी चोरला आहे . अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक निलगिरी सर्कल लिंबायत सुरत गुजरात येथे रवाना केले . पथकाने सदर परिसरात वेषांतर करुन माहिती मिळवून दोन्ही इसमांना सापळा लावुन ताब्यात घेतले . त्यांना विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी चोरीचे गुन्ह्यातील ३ हजाराचा मोबाईल काढुन दिल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर केले . उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,कोठली येथील शेतातील उघड्या घरातुन चोरी वेडापावला येथील सराईत संशयीत आरोपी अक्षय शांतु वळवी याने केली असुन तो चोरीचे मोबाईल कमी किमतीत विक्री करीत आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वेडापावला येथुन अक्षय शांतु वळवी यास ताब्यात घेतले . त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदर चोरी केल्याचे कबुल करून गुन्ह्यातील चोरी केलेले २७ हजाराचे ३ मोबाईल हॅन्डसेट काढुन दिले . त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी. आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील , पोलीस हवालदार महेंद्र नगराळे , पोहवा प्रमोद सोनवणे , पोना विशाल नागरे , दादाभाई मासुळ राजेंद्र काटके , जितेंद्र ठाकुर , पोकॉ शोएब शेख , चापोना रमेश साळुंखे यांचे पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे आगामी सण उत्सवाच्या पाश्वभूमीवर पोलीस दलातर्फे पथसंचलन

Next Post

असा मिळतो लाभ: एटीएम कार्ड धारक असलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू, प्रत्येकी दोन लाखाचा अपघात विमा धनादेश वारसास प्रदान

Next Post
असा मिळतो लाभ: एटीएम कार्ड धारक असलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू, प्रत्येकी दोन लाखाचा अपघात विमा धनादेश वारसास प्रदान

असा मिळतो लाभ: एटीएम कार्ड धारक असलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू, प्रत्येकी दोन लाखाचा अपघात विमा धनादेश वारसास प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add