खापर l प्रतिनिधी
पंचायत समितीच्या मासिक सभेची सुरुवात आता वंदे मातरम या राष्ट्र गान ने होत असल्याचे सुखद चित्र अक्कलकुवा पंचायत समितीत दिसुन आले.यापुर्वी मासिक सभेला कुठलीही प्रार्थना, प्रतिज्ञा किंवा राष्ट्रगीत होत नसे.
यापुर्वी अक्कलकुवा पंचायत समितीच्या मासिक सभेला सरळ सुरुवात होत असे मात्र आता सभेची सुरुवात ही वंदे मातरम या राष्ट्र गान ने तर सभेची समाप्ती राष्ट्रगीताने करण्यात येत आहे. पंचायत समितीच्या झालेल्या मासिक सभेत अक्कलकुवा पंचायत समितीचे अक्कलकुवा गणाचे व भारतीय जनता पक्षाचे सदस्य ॲड.सुधीर पाडवी यांनी बैठकीची सुरुवात ही वंदे मातरम या राष्ट्र गान ने व्हावी अशा मागणीचा प्रस्ताव सभापती मनिषा वसावे व उपसभापती विजय पाडवी तसेच पिठासीन अधिकारी गट विकास अधिकारी नंदकिशोर सुर्यवंशी यांच्या समोर ठेवला होता. त्यांच्या प्रस्तावाला शिवसेनेचे सदस्य जेका पाडवी यांनी अनुमोदन दिले होते. त्यामुळे सभागृहातील सर्वच सदस्यांनी एकमुखाने सुधीर पाडवी यांच्या मागणीला पाठबळ देत पंचायत समितीची मासिक सभा ही वंदे मातरम या राष्ट्र गान नेच करावी यासाठी इतिवृत्तात रीतसर ठराव करण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे सभापती मनिषा वसावे व उपसभापती विजय पाडवी यांच्या आदेशाने गट विकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी सभेत तसा रितसर ठराव पारित केला.त्यानुसार पंचायत समितीच्या मासिक सभेची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्र गानने तर सभेची समाप्ती राष्ट्रगीताने करण्यात आली.सभेची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्र गान ने करावी असा ठराव पारित करणारी अक्कलकुवा पंचायत समिती कदाचित महाराष्ट्रातील पहिली पंचायत समिती असावी त्यामुळे सदस्यांनी आनंद व्यक्त केला.