नंदुरबार l प्रतिनिधी
येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे यांनी तालुक्यातील तलवाडे खुर्द, शनिमांडळ येथे गर्भवती मातांची मोफत तपासणी करत औषधोपचार केले.

सदर शिबिराचे आयोजन दिग्विजय राजपूत यांनी केले होते.
यावेळी नंदुरबार तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनमार्फत निलेश शर्मा व महेश राजपूत यांनी मोफत औषधी उपलब्ध करुन दिल्या. यावेळी गावातील महेंद्र राजपूत, कांतीलाल धनगर, सुनिल गिरासे, भटू धनगर, जिभाऊ पाकडे, भाऊराव भिल, सोनू कोळी, युवराज धनगर उपस्थित होते. यशस्वितेसाठी अमोल राजपूत, गणेश राजपूत, भूपेंद्र राजपुत, भरत कोळी, रमेश राजपूत, महेंद्र कापडे यांनी परिश्रम घेतले. सदरचे शिबिर प्रथमच ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने मातांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागात तज्ञ डॉक्टर व औषधींचा लाभ मिळावा हा या शिबिरामागील उद्देश असल्याचे दिग्विजय राजपूत यांनी सांगितले.








