Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बामखेड्याची केळी पोहचली सात समुद्रापार आखाती देशांमध्ये

team by team
April 1, 2022
in कृषी
0
बामखेड्याची केळी पोहचली सात समुद्रापार आखाती देशांमध्ये

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बामखेड़ा येथील शेतकरी विकास सोनार व त्यांचे सुपुत्र किरण सोनार यांनी आपल्या कृषी ज्ञानाच्या आधारावर व अनुभवावर आधुनिक शेती करत केळीची लागवड केली. पूर्णवेळ शेतीत खर्च केला. वेगवेगळे प्रयोग, तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आपली केळी इराण, अफगाणिस्तान दुबई या आखाती देशांमध्ये पाठविली. शेतीत नेहमी वेगळे वेगळे प्रयोग करून जिद्दीच्या बळावर सातासमुद्रापार केळी पोहोचवली.
शहादा तालुक्यात बहुतांश शेतकरी प्रयोगशील शेती करीत असून विविध प्रकारचे पिके घेऊन उत्पादित झालेल्या मालाच्या सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यातच बामखेडा (ता. शहादा )येथील विकास सोनार यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे, त्या ज्ञानाचा वापर व तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन शेती कसणे सुरू केले त्यात त्यांनी बामखेडा शिवारात असलेल्या एकूण क्षेत्रापैकी पाच एकरात जैन केळी प्रकाराच्या सुमारे  सहा हजार केळीच्या रोपांची ठिंबक सिंचनावर लागवड केली.आतापर्यंत सुमारे 120 .टन माल विक्री गेला असून एका केळीच्या घडाचे वजन 42 ते 45 किलो वजन आहे.लागवडीनंतर पुरेसे शेतीचे ज्ञान नसल्याने तज्ञांकडून  माहिती मिळवण्यात कोणताही कमीपणा मनात ठेवला नाही. विविध आधुनिक पद्धतीचा अवलंब करून केळीची बाग फुलविली त्यात बाग पाहून अनेकांनी भेटी दिल्या तर काहींनी मार्गदर्शन केले. केळीला सध्या पंधराशे रुपयांहून अधिक दर मिळत असून केळीच्या दर्जा पाहून अधिकाधिक भाव मिळत असतो. परिसरात असलेल्या लोकल मार्केट पेक्षा निश्चितच भाव जास्त मिळतो, त्यामुळे शेतकऱ्याला ही दोन पैसे जास्त मिळत असल्याने परदेशात निर्यात वाढली आहे.
परिसरातून केळी आखाती देशात
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.केळीच्या दर्जानुसार केळीची तोडणी होते. तोडणी केल्यानंतर बॉक्स पॅकिंग करून गाडी भरली जाते. थेट नासिक रवाना झाल्यानंतर 13 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवले जाते. तद्नंतर बंदरावर कंटेनरमध्ये भरुन जहाजाद्वारे आखाती देशांमध्ये रवाना होते. एका हंगामात जिल्ह्यातून तून विविध खरेदीदार कंपन्यांकडून सुमारे दीड हजार कंटेनर केळी आखाती देशात पाठवली जाते.

योग्य नियोजन, मेहनत
शेतकरी विकास सोनार यांनी ऊस, पपई, मिरची या पिकासोबत पाच एकरात लागवड केलेल्या केळीच्या बागेकडे विशेष लक्ष देत  रोपांचा लागवडीपासून ते काढणीपर्यंत सनराईज कंपनी तरडी जि जळगाव चे व्यापारी हिम्मत दत्तात्रय पाटील . तसेच शहादा येथील अविष्कार ॲग्रो एजन्सी चे संचालक जाकीर शहायांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी वेळोवेळी सुचविलेल्या उपयांनुसार रोपांची वाढ होण्यासाठी खतांची मात्रा व पाण्याचे योग्य नियोजन करून केळीची बाग फुलविली.  केळीच्या  लॉट रवाना करण्यात आला असून अजून मोठ्या प्रमाणावर केळी बागेत शिल्लक आहे. आखाती देशात केळी निर्यात होत असल्याचा  मनस्वी आनंद होत असल्याचे श्री.सोनार सांगतात.

बातमी शेअर करा
Previous Post

अंबागव्हाण व सितापावली येथे स्वातंत्र्यानंतर पोहचली विज

Next Post

बामखेडा येथील प्रा वाय.सी. गावित यांना पीएचडी प्राप्त

Next Post
बामखेडा येथील प्रा वाय.सी. गावित यांना पीएचडी प्राप्त

बामखेडा येथील प्रा वाय.सी. गावित यांना पीएचडी प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add