Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हत्येची तक्रारीनंतर पोलिसांनी उकरले पुरलेल्या प्रेत,महिले ऐवजी निघाला पुरुषाचा मृतदेह

team by team
March 30, 2022
in क्राईम
0
हत्येची तक्रारीनंतर पोलिसांनी उकरले पुरलेल्या प्रेत,महिले ऐवजी निघाला पुरुषाचा मृतदेह

शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा  येथील कै. शिलाबाई दत्तू पाटील ही ७२ वर्षीय वृद्धेचा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज लोणखेडा येथील  स्मशानभूमी तपास सुरू  केला प्रेत पुरलेल्या  त्या ठिकाणाहून महिले ऐवजी पुरुषाचा मृतदेह बाहेर आल्याने पथकाने तपास थांबविल्याने सर्वत्र या प्रकाराची चर्चा सुरू आहे नेमकी महिलेची हत्या कोणी केली तिच्या हत्येचे कारण काय याबाबत तक्रार कोणी दाखल केली याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहे.


तालुक्यातील लोणखेडा येथील कै. शिलाबाई दत्तू पाटील ही ७२ वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू जानेवारी महिन्यात झाला समाजाच्या रितीरिवाजानुसार तिच्यावर लोणखेडा येथील स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला मात्र सदर महिलेचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तिची हत्या करण्यात आली आहे अशी तक्रार काही दिवसांपूर्वी गोपनीय रित्या थेट जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख पी आर पाटील यांनी सदर तक्रारीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे दिल्यानंतर त्यांच्या पथकाने चार दिवसापासून शहादा शहर व लोणखेडा परिसरात तपासाची चक्रे फिरवली सोमवारी उशिरा मयत महिलेच्या मुलगा संजय दत्तू पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्या आईचा दफनविधी लोणखेडा येथील गोमाई नदी किनारी स्मशानभूमीत नातेवाईकांच्या व समाज बांधवांच्या उपस्थिती दफनविधी  केला असल्याची माहिती पोलिसांना दिली.
मंगळवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी लोणखेड्याचे मंडळ अधिकारी प्रदीप पाटील एल सी बि चे पोलीस निरीक्षक रविंद्र  कळमकर फॉरेन्सिक विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी पी थोरात,डॉ. व्ही टी साळुंखे याच्यासह पोलिसांच्या पथकाने लोणखेडा येथील गोमाई नदी किनारी स्मशानभूमीत मयत महिलेच्या मुलाने दाखविलेल्या जागेवर खोदकाम सुरू केले सुमारे दोन ते तिन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या ठिकाणी मृतदेह असल्याचे पथकाला आढळून आल्यानंतर सर्वांची उत्सुकता वाढली होती मजुरांच्या सहाय्याने सदर मृतदेह बाहेर काढून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो मृतदेह  पुरुषाचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी निराश झाले मुळात मयत महिलेच्या मुलाने सदर जागा दाखविली असल्याने पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर विश्वास ठेवून खोदकाम केले मात्र, महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह सदर ठिकाणी आढळून आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
पोलिसांतर्फे स्मशान भूमीत काहीतरी कारवाई होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती  या कारवाईबाबत  गोपनीय तक्रार दाखल झाली असल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली गेल्या दोन दिवसापासून लोणखेडा परिसरात गोपनीय पद्धतीने पोलिसांनी तपास केल्यानंतर आज प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी नेमके काय घडत आहे याची उत्सुकता सर्वाना  होती मात्र पोलिसाच्या पथकाने मृतदेह पुन्हा सन्मानाने दफनविधी केल्यानंतर सरळ निघून गेल्याने संपूर्ण  परिसरात याबाबत अनेक चर्चा रंगत आहेत मुळात नैसर्गिकरित्या मृत्यू झाला असल्यानंतर अचानक हा प्रकार हत्तेचा आहे खुणाचा आहे अशी तक्रार थेट जळगाव जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा पोलीस प्रमुखांकडे झाल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे तक्रारदार हा खात्रीलायक असल्यामुळेच पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून या घटनेची चौकशी सुरू केली होती पोलिसांना काहीतरी धागेदोरे मिळाल्यानंतर आज त्यांनी प्रत्यक्ष चौकशी ला सुरुवात केली मात्र अपेक्षित यश मिळाले नसल्याने तपास थांबविला असल्याने पुन्हा याप्रकरणी चौकशी पोलिसांतर्फे केली जाईल अशीही चर्चा सुरू होती मात्र सदर घटना सत्य असल्याचे तक्रार करणारा व त्याबाबत पोलिसांना पुरावे देणारा कोण..? ,त्याचा या संपूर्ण घटनेची संबंध  काय ..? त्याला ही हत्या आहे अशी माहिती कोणी व का दिली..? , त्याचा उशिरा तक्रार करण्याचा हेतू काय..? असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच असल्याने आज दिवसभर पोलिसांनी केलेली कारवाई लोणखेडा गावासह  संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात केली जात होती.
या संपूर्ण प्रकाराबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास अधिकाऱ्यांशी माहिती जाणून घेतली असता त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे  तक्रार दाखल असल्याने आम्ही त्यानुसार चौकशी करत आहोत याबाबतचा सर्व अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडे  दिला जाईल मयत महिलेचा मुलाची मानसिक स्थिती कदाचित ठीक नसल्याने त्याने योग्य जागा दाखविली नाही मात्र या प्रकाराचा तपास पोलिसांतर्फे सुरू राहील असे सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुव्यात २५ लाखाचा अवैध दारूसाठ्यासह ४१ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

हप्ते वेळेवर खात्यात येत नसल्याने घरकुल लाभार्थी परेशान

Next Post
हप्ते वेळेवर खात्यात येत नसल्याने घरकुल लाभार्थी परेशान

हप्ते वेळेवर खात्यात येत नसल्याने घरकुल लाभार्थी परेशान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add