Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साकलीउमर ते वेली या रस्त्याचे खडीकरण काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

team by team
March 28, 2022
in राज्य
0
साकलीउमर ते वेली या रस्त्याचे खडीकरण काम  निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील साकलीउमर ते बेडाकुंड ते वेली या रस्त्याचे काम सुमारे 2 वर्षा पासुन सुरु आहे.अधुन मधुन होणाऱ्या या रस्त्याच्या खडीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे.याबाबत निवासी उप जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटुन ग्रामस्थांनी निवेदन दिले.


वेली आणि बेडाकुंड येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वेली,बेडाकुंड, वाडीबार आदी गावातील नागरिकांना तालुक्याचे ठिकाणी किंवा मोलगी येथे येण्या – जाण्यासाठी साकलीउमर ते बेडाकुंड ते वेली असा रस्ता आहे सदर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वेली, बेडाकुंड परिसरातील नागरिकांनी नव्याने रस्ता बनविण्याची मागणी केली होती.त्यानुसार सन 2019/ 20 या आर्थिक वर्षात पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत साकलीउमर ते बेडाकुंड ते वेली हा रस्ता मंजूर करण्यात आला व प्रत्यक्षात त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली,मात्र सदर रस्त्याच्या कामाला सुमारे दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असतांना देखील आतापर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे माती काम न करता सरळ सरळ अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणावर अत्यंत निकृष्ट दर्जाची खडी टाकण्यात आली व त्यावर रोलरने दबाईचे काम देखील केले गेले नाही,परिणामी रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी ही बाहेर निघून ठिक ठिकाणी तिचे ढिग तयार । मोठी कसरत करावी लागत आहे. रात्री बेरात्री येणाऱ्या मोटरसायकल स्वारांना छोट्या मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. उतारावरील पाणी वाहून जाण्यासाठी ठिक ठिकाणी पाईप मोऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत.मात्र रस्त्यावरील काही मोरीं मध्ये कोणत्याही प्रकारचे पाईप टाकण्यात आले नाहीत. केवळ थातूरमातूर पणे रस्त्याच्या बाजूला नाममात्र देखाव्यासाठी एक फुटाच्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत. परिणामी अशा बांधकामामुळे मोरींचा उद्देश पूर्ण झालेला नाही काही ठिकाणी पावसात मोर्‍यां वाहून गेल्या आहेत. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे काही ठिकाणी रस्त्याचे नवीन काम देखील वाहून गेले आहे असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग्रामस्थांनी सदर रस्त्याच्या तक्रारी वेळोवेळी केल्या आहेत तरी देखील त्यावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही त्यामुळे येत्या पंधरा दिवसात या रस्त्याच्या बाबतीत शासन व प्रशासन स्तरावरुन योग्य कार्यवाही न झाल्यास वेली,बेडाकुंड परिसरातील शेकडो नागरिकांनी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेवटी निवेदनात दिला आहे.निवेदनावर वेलीचे सरपंच गुमानसिंग तडवी, दिनेश मोग्या तडवी, अशोक बोंडा वळवी, रामसिंग जात्र्या पाडवी, विजय पाडवी, धर्मा बोंडा पाडवी, नरपत सोन्या पाडवी, गुलाबसिंग रतनसिंग वळवी, कालुसिंग वळवी आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार नगरपालिकेचा अजब कारभार, बगलबच्याना सूट तर सामान्य नागरिकांनी लूट : माजी.आमदार शिरीष चौधरी

Next Post

भूमिपूजनाला कॉंग्रेसच्या आमदाराला बोलवू शकते तर आ.पाडवी तर भाजपाचेच आहेत : खा.डॉ.हीना गावित

Next Post
खा.डॉ.हीना गावित यांना सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर, २६ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण

भूमिपूजनाला कॉंग्रेसच्या आमदाराला बोलवू शकते तर आ.पाडवी तर भाजपाचेच आहेत : खा.डॉ.हीना गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add