Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाशिक येथे पंचवटीत आलेल्या भाविकांना व निराधारांना नंदुरबारच्या साक्षी मेमोरियल फाऊंडेशनकडून अन्नदान

team by team
March 27, 2022
in सामाजिक
0
नाशिक येथे पंचवटीत आलेल्या भाविकांना व निराधारांना नंदुरबारच्या साक्षी मेमोरियल फाऊंडेशनकडून अन्नदान

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील साक्षी मेमोरियल फाऊंडेशनकडून नाशिक मधील धार्मिक व पवित्र स्थान असलेल्या पंचवटीत आलेल्या भाविकांसाठी व रस्त्यावरील निराधारांसाठी दिवंगत साक्षी हिच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

पंचवटीत दररोज संपूर्ण भारतातून असंख्य भाविक येत असतात . अनेक भाविकांची रहाण्या खाण्याची सोय नसते व हॉटेलचे जेवण सर्वांनाच परवडते असे नाही . अशा भाविकांना उपाशी किंवा अर्धपोटी रहावे लागते व त्यांची उपासमार होते . ही बाब लक्षात घेऊन नंदूरबार येथील साक्षी मेमोरियल फाऊंडेशन यांच्याकडून अन्नदानाचा कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्षा संगिता दिलीप साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाचा लाभ अनेक भाविक व गरजूंनी घेतला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील नामवंत सेवाभावी संस्था अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या संस्थेचे वित्तीय संचालक भिकन दंडगव्हाळ उपस्थित होते . श्री . दंडगव्हाळ यावेळी म्हणाले की , ” भारतीय संस्कृतीत भुकेलेल्यांना अन्नदान करण्याचे मोठे महत्व आहे . अन्न ही एकमात्र अशी बाब आहे की ज्यामुळे शरीरासोबतच आत्माही तृप्त होतो आणि त्यामुळेच अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ” , कार्यक्रमाच्यावेळी संस्थेचे खजिनदार राजेंद्र वसंत शिंदे , सदस्या कल्पना राजेंद्र साळुंके , भावना सुनिल साळुंके व साळुंके परिवारासह संस्थेचे हितचिंतक राजेंद्र हिरे , निरंजन गोसावी , सोमनाथ जाधव , विलास बेडसे , डी . एम . पाटील आदि उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या सर्वांनी परिश्रम घेतले .

बातमी शेअर करा
Previous Post

वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई, राज्य सरकारने लागू केला मेस्मा कायदा

Next Post

२९ कृषिपंपांचे संपूर्ण वीजबिल भरून नंदूरबार जिल्ह्यातील बळीराजाची वचनपूर्ती

Next Post
२९ कृषिपंपांचे संपूर्ण वीजबिल भरून नंदूरबार जिल्ह्यातील बळीराजाची वचनपूर्ती

२९ कृषिपंपांचे संपूर्ण वीजबिल भरून नंदूरबार जिल्ह्यातील बळीराजाची वचनपूर्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add